‘तो’ माझ्यासाठी धक्काच होता : पंकजा मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करणं हा माझ्यासाठी एक धक्का होता असं असे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

मुलाखतीत त्यांना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन सरकार बनवण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की , ‘मला काहीच कल्पना नव्हती. पक्षाच्या कोअर कमिटीची सदस्य असली तरी मला त्या निर्णयाबद्दल काही माहित नव्हते. जेव्हा मी शपथविधी पाहिला तेव्हा तो माझ्यासाठी सुद्धा धक्का होता. राज्य राष्ट्रपती राजवटीतून बाहेर पडले त्याचा मला आनंद झाला होता. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याबद्दल मी अभिनंदन केलं. पण मला या सरकार स्थापनेने फार आनंद झाला नाही. माझ्यासाठी तो धक्का होता.’

‘मी पुन्हा येईन’ चा त्रास फडणवीसांना पुढची 5 वर्ष होणार
‘मी पुन्हा येईन’ ही कविता देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केली होती. त्यानंतर ही ओळ प्रचाराची टॅगलाईन म्हणून वापरण्यात आली. मात्र आता टॅगलाईनची विरोधकांनकडून खिल्ली उडवली जात आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की , ‘मी बोललेली नसतानाही मला ‘जनतेच्या मनातली मुख्यमंत्री’ या वाक्याने गेली 5 वर्ष छळलं होतं. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीतही तसंच झालं. त्यांच्या मनात काही नसेल, मात्र त्यांच्या मी पुन्हा येईल या कवितेमुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं आणि पुढची पाच वर्ष त्यांना ते छळणार आहे. फडणवीसांनाही त्या कवितेचा त्रास होण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

 

You might also like