ठरलं ! आता ऑनलाईन रिलीज होणार ‘अमिताभ बच्चन-आयुष्मान खुरना’चा ‘गुलाबो सिताबो’ ! या दिवशी होणार प्रीमियर

पोलिसनामा ऑनलाइन –बिग बी अमिताभ आणि आयुष्मान खुराना स्टारर गुलाबो सिताबो हा सिनेमा आता ऑनलाईन रिलीज होणार आहे. शुजित सरकार डायरेक्टेड हा सिनेमात आता अॅमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे. 12 जून रोजी सिनेमाचा प्रीमियर होणार आहे.

बिग बी अमिताभ आणि आयुष्मान खुराना यांनी सोशल मीडियावरून सिनेमाच्या रिलीजबद्दल माहिती दिली आहे. हा सिनेमा 17 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार होता परंतु लॉकडाऊमुळं ते काही शक्य झालं नाही. अमिताभ आणि आयुष्मान यांची मजेदार जोडी सिनेमात पहायला मिळणार आहे.

गुलाबो सिताबो हा सिनेमा जुही चतुर्वेदीनं लिहिला आहे. तिनं याआधी विक्की डोनर, पीकू आणि अक्टूबर असे सिनेमे लिहिले आहेत ज्याना क्रिटीक्सकडूनही खूप वाहवा मिळाली आहे. एका घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील सततच्या भांडणांची यात स्टोरी आहे. बिग बींनी घर मालकाची भूमिका साकारली आहे. चाहतेही या सिनेमाची आतुरतेनं वाट पहात आहेत. अशात आता ऑनलाईन रिलीजची बातमी ऐकून चाहते नक्कीच खुश झाले असतील यात मात्र शंका नाही.