‘या’ कारणामुळंच आदित्य ठाकरेंची कॅबिनेटमध्ये ‘वर्णी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महविकास आघाडी सरकारच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. नव्याने संधी देण्यात आलेल्या चेहऱ्यांना खातेवाटपात महत्त्वाची खाती देण्यात आली. नव्या चेहऱ्यांना संधी देताना अनेक ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आला. नव्याने समावेश करण्यात आलेल्या चेहऱ्यांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि आमदार आदित्य ठाकरे यांचा समावेश करण्यात आला. त्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्यावर पर्यावरण मंत्रालयाचा भार सोपवण्यात आला आहे.

पहिल्यांदाच राजकारणात उतरलेले आदित्य ठाकरे हे आमदार झाले. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी देण्यात आली. विधानसभेत दाखल झालेल्या तीन युवा नेत्यांना मंत्रिमंडळात उद्धव ठाकरे यांनी संधी दिली. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, आणि प्राजक्त तनपुरे या युवा नेत्यांचा समावेश आहे. या दोघांना राज्यमंत्रिपद देण्यात आले. मात्र आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लावण्यात आली. यामागे एक खास कारण आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नाजूक प्रकृतीमुळे आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले. उद्धव ठाकरे यांची नाजूक प्रकृती पहाता, त्यांच्यासोबत घरातील कोणी तरी असावं अशी कुटुंबीयांची इच्छा होती. कॅबिनेट मंत्री असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणे आदित्य यांना शक्य होणार आहे. यामुळे उद्धव यांची कुटुंबीयांना काळजी घेता येईल. दुसरीकडे आदित्य यांना मंत्रीपद दिल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांसोबत अधिक वेळ राहिल्याने आदित्य यांना अनेक गोष्टी शिकायला मिळणार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/