… म्हणून मी निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो घरी लावणार : डॉ. खा. सुजय विखे

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – विधासभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे त्यामुळे सभांसोबत कार्यकर्ते मतदारसंघाचा कोपरा न कोपरा पिंजून काढत आहेत. नुकतीच खासदार सुजय विखे यांनी युतीच्या प्रचारासाठी शिर्डीत सभा घेतली. यावेळी विखे आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील संघर्ष पहायला मिळाला. सुजय विखे म्हणाले मी सत्ताधारी पक्षात आलो आणि माझे वडील मंत्री झाले याचं श्रेय थोरातांना जातं म्हणून मी निवडणूक झाल्यावर त्यांचा एक फोटो घरी लावणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना माज होता, सत्तेची गुर्मी आहे, त्यांना माहित नव्हतं की या देशात चौकीदार येणार आहे. तो तुमचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात देखील सुजय विखे यांनी केला. तसेच आघाडी ने तिकीट नाकारल्याबद्दल बोलताना सुजय विखे म्हणाले मी सुशिक्षित आहे आणि राष्ट्रवादीचं म्हणणं असेल आमच्या पक्षाकडे वाळू तस्कर आहे, डाकू आहेत मग या डॉक्टरांचं काय काम आहे. माझ्यावर एकही गुन्हा नाही, मी गरिबाचे पैसे खाल्ले नाहीत यामुळे मला लोकसभेला तिकीट नाकारलं असेल असा टोलाही सुजय विखेंनी यावेळी आघाडीला लगावला.

शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा अजित पवारांच्या डोळ्यात पाणी आलं मात्र आमच्या हक्काचं पाणी पळवलं, तेव्हा हे पाणी कुठं होतं ? एवढंच नाही तर ज्यावेळी मावळात शेतकऱ्यांवर गोळीबार झाला त्यावेळी हे डोळ्यातलं पाणी कुठं होतं ?. तुमच्या पापाचा घडा आता भरला आहे. तुम्ही पुढील काही वर्षात जेलमध्ये जाणार आहात असा इशारा देखील सुजय विखेंनी यावेळी दिला आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी