‘या’ कारणामुळं आम्ही अजित पवारांसोबत गेलो, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं गुपित, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारणामध्ये एवढ्या उलथा पालथं झाल्या की राज्याने ८० तासांचा देखील मुख्यमंत्री पाहिला. अजित पवार यांना तीन पक्षाचे सरकार चालेल याची खात्री नव्हती, म्हणून ते आमच्याकडे स्वतःहून आले म्हणून आम्ही सरकार स्थापनेचा निर्णय घेतला असा खुलासा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करत मुख्यमंत्री पदाची शपत घेतली होती. त्यानंतर भाजपला अशी काय नामुष्की होती की अजित पवारांची मदत घ्यावी लागली असा सवाल फडणवीस यांना एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत विचारण्यात आला होता.

यावर खुलासा करताना फडणवीस म्हणाले, अजित पवार हे स्वतःहून आमच्याकडे आले होते आम्ही खूप खुशीने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला नाही परंतु आमचा जनादेश असताना, म्हणजे आम्ही ७० % गुण मिळवले आणि वर्गामध्ये पहिले आलो तरीही ४० % गुण मिळवणारे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी आमचे मिरीट काढून घेतले अशा परिस्थितीत विशिष्ट निर्णय करावे लागतात, येणारा काळ ठरवेल हा निर्णय बरोबर होता की चुकीचा परंतु त्यावेळी ते योग्य वाटलं म्हणून घेतला असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

आता भाजपची अजित पवारांबाबत कोणती भूमिका आहे ?
सत्ता नाट्याच्या प्रकारानंतर आता अजित पवारांबाबत भाजपची काय भूमिका आहे कारण सिंचन घोटाळ्यावरून भाजपने २०१४ ला जोरदार प्रचार केला होता असा सवाल देखील फडणवीस यांना करण्यात आला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले सिंचन घोटाळ्यांबाबतची भूमिका आम्ही बिलकुल बदललेली नाही, तसेच अजित पवारांना मिळालेली क्लीन चिट ही सत्ता स्थापनेमुळे मिळालेली नाही तर या आधी मिळालेली असल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले

अजित पवारांच्या क्लीन चिट बाबत बोलताना फडणवीस म्हणाले दोन ऍफिडेविट याबाबत जमा आहेत एक सांगते की या घोटाळ्यासाठी सचिव जबाबदार आहेत ज्याचा मंत्र्यांच्या सहीशी काही संबंध नाही तर दुसरे ऍफिडेविट सांगते की मंत्री देखील जबाबदार आहे. त्यामुळे याबाबतचा निकाल हा उच्च न्यायालयचं देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/