क्रिकेटमध्ये होत आहेत मजेदार ‘बदल’ ! 10 बॉलचा ‘ओव्हर’ तर LBW ‘आउट’ नाही

लंडन : वृत्तसंस्था – क्रिकेटमधील कसोटी, एकदिवसीय आणि टी २० या प्रकारचे सामने तुम्हाला माहीत आहेत. मात्र आता एक नवीन प्रकारचे क्रिकेट सामने सुरु होणार असून हे सामने फक्त १० ओव्हरचे असणार आहेत. इंग्लंडमधील इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड या नव्या फॉरमॅट मधील स्पर्धेचे आयोजन करणार असून ‘द १०० लीग’ या नावाने ही स्पर्धा लंडन मध्ये होणार आहे. २०२० या वर्षाच्या जुलै आणि डिसेंबर मध्ये ही स्पर्धा होणार आहे.

याआधी देखील १०० चेंडूच्या सामन्यांची घोषणा एप्रिल २०१८ मध्ये केलेली होती. १०० चेंडूच्या या सामन्यांमध्ये ६ चेंडूच्या १५ ओव्हर तर शेवटची ओव्हर १० चेंडूची असणार आहे. मात्र या स्पर्धेतील नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून नवीन बदल ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

हे आहेत स्पर्धेचे नवीन नियम :
१) १०० चेंडूचा सामना असणार आहे ज्यामध्ये १०-१० चेंडूच्या १० ओव्हर असतील.

२) स्पर्धेत कोणताही फलंदाज एलबीडब्ल्यू आऊट होणार नाही.

लंडनमधील या स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्स, ओव्हल इन्विंसिबल, मॅंचेस्टर ओरिजनल्स, नॉर्दर्न सुपरचार्जर्स, बर्मिंगहॅम फोएनिक्स, वेल्श फायर, साऊदर्न ब्रेव, लंडन स्पिरिट या संघांचा समावेश असेल.

यातील एका संघाचे प्रशिक्षक दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर आणि भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन असणार आहेत. नुकत्याच झालेल्या महिला टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने विजेतेपद मिळवले होते. त्यांच्या या स्पर्धेसंदर्भातील भावना जाणून घेतल्या असता त्यांनी प्रतिक्रिया नोंदवली, ‘ही एक सुवर्ण संधी असून मी इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डासोबत कधीच काम केलेले नाही. मला खात्री आहे की, ही स्पर्धा लोकप्रिय होईल.’

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like