१७ वर्षाच्या युवतीची टेरेसवरुन उडी मारुण आत्महत्या

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

कसबा पेठेतील एका वकिलाच्या मुलीने इमारतीच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजता घडली असून त्यात माधवी विशाल काळे (वय १७) या युवतीचा मृत्यु झाला आहे. या घटनेने वकिल असलेल्या माधवीचे वडिल आणि त्यांच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5d5d427f-8e2f-11e8-8d56-615595fa3b3e’]

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माधवी फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होती. रविवारी सकाळीच ती क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडली. ती क्लासवरुन दुपारी दीडच्या सुमारास परत आली. त्यांच्या साई विधी इमारतीचे काम सुरु आहे. माधवी ही क्लासवरुन परत आल्यावर घरी जाण्याऐवजी सरळ टेरेसवर गेली व तेथून तिने खाली उडी मारली. तिचा खाली पडल्याचा आवाज ऐकून लोकांनी तेथे धाव घेतली. तिला तातडीने केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. माधवीच्या मृत्युचे कारण अद्याप समजले नसून फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहेत.