‘आई’ थोर तुझे उपकार ! 29 वर्षीय महिलेनं 12 लिटर ‘ब्रेस्ट मिल्क’ केले दान, 5 बाळांना मिळाले जीवदान

अहमदाबाद : वृत्तसंस्था – आईचे दूध नवजात बाळासाठी अत्यंत गरजेचे आणि उपयुक्त असते. सहा महिन्यापर्यंत प्रत्येक बाळा आईचे दूध मिळणे आवश्यक आहे. परंतु काही बाळांना आईचे दूध मिळत नाही. मात्र, अशा बाळांसाठी एक 29 वर्षीय महिला आईबनून धाऊन येत एक नवा आदर्श समाजापूढे ठेवला आहे. या महिलेने 12 लिटर ब्रेस्ट मिल्क दान केले आहे. तिने दान केलेल्या दुधामुळे गंभीर आजारी, अविकसित आणि गरजू पाच बाळांना जीवदान मिळाले आहे. सध्या ही नवजात बाळं एनआयसीयूमध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या बाळांचा जन्म वेळेआधी झाला होता.

रूशिना मारफातिया असे या महिलेचे नाव आहे. रुशिना या शिक्षिका असून त्यांनी अर्पण नवजात शिशू देखभाल केंद्राद्वारे ही मदत केली आहे. हे नवजात बाळ केंद्र डॉ. आशिष मेहता चालवतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुशिना यांनी दान केलेले दूध 600 ग्रॅम ते 1.5 किलोग्रॅम वजनाच्या बाळाला देण्यात आले. त्यामुळे या बाळांचा जीव वाचला. या नवजात बाळाची आई खूप आजारी हेती, त्यामुळे ती स्तनपान करु शकत नव्हती.

रुशिना या अहमदाबाद येथील एका खासगी कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपली इच्छा कुटुंबीयांना बोलून दाखवली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी अर्पण नवजात शिशू केंद्राचा पत्ता शोधून काढला. या केंद्रामध्ये मदर्स ऑन मिल्क बँक ही सुविधा देण्यात येते. डॉ. मेहता यांनी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली असून आता त्यांच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रुशिना यांनी ब्रेस्ट मिल्क दान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनीही नुकत्याच एका मुलाला जन्म दिला आहे. मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांना जाणवलं की जास्त प्रमाणात दूध येतंय. त्यामुळे त्यांनी दूध दान करण्याचा निर्णय घेतला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/