35 वर्ष जुन्या Super Mario नं मोडले रेकॉर्ड ! 85 लाखपेक्षा अधिक विकल्या गेल्या सील्ड कॉपी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Super Mario Bros गेम लॉन्च झाल्यानंतर जवळपास ३५ वर्षांनंतरही विक्रम मोडत आहे. १९८५ मध्ये रिलीज झालेल्या या गेमच्या अमेरिकन व्हर्जनच्या एका दुर्मिळ सील्ड कॉपीच्या हेरिटेज लिलावात ११४,००० डॉलर्स (सुमारे, ८५,७२,२६७ रुपये) मध्ये विकली गेली. मागील वर्षी दुसर्‍या आणखी एका Super Mario Bros गेमची कॉपी १००,१५० डॉलरमध्ये (सुमारे ७५,३०,६२९ रुपये) विकली गेली होती. अशाप्रकारे नवीन लिलावात विकल्या गेलेल्या गेमची किंमत मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे १४,००० डॉलर (१०.५ लाख रुपये) जास्त लावण्यात आली आहे.

लिलावात करण्यात आलेल्या या विक्रमी बोलीबद्दल गेम जर्नालिस्ट ख्रिस कोहलर यांनी लिहिले की, या लिलावात सिंगल गेमच्या विक्रीचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे. ख्रिस कोहलर यांच्या म्हणण्यानुसार, हा आतापर्यंतचा सर्वात महागडा गेम आहे.

खरंतर हा गेम पूर्णपणे ओरिजिनल पॅकिंगमध्ये आणि योग्य स्थितीत आहे आणि त्याचे ग्रेडिंग १० पैकी ९.४ पर्यंत केले गेले आहे. कदाचित हेच कारण आहे की हे पूर्वीपेक्षा जास्त किंमतीत विकले गेले. तसेच हे यूएस रिटेल एडिशनचे एक खास व्हर्जन देखील आहे.

हे देखील आहे वैशिष्ट्य

द वर्जनुसार, जसजसे Nintendo ने अमेरिकेत आपली कंपनी स्थापन करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांचे पॅकेजिंग जवळजवळ सतत अपडेट केले गेले. मारिओच्या या सील्ड गेमच्या बॉक्समध्ये प्लास्टिक कार्ड बोर्ड हँगटॅब लावले गेले होते. याचा अर्थ असा की, ही कॉपी Nintendo ने बनवलेल्या प्रारंभीच्या रूपांपैकी एक आहे. यानंतर कंपनीने गेम सील करण्यासाठी स्टिकरऐवजी रॅपर्स वापरण्यास सुरवात केली होती.

सर्व काही बघता या गेमची किंमत ११४,००० डॉलर्स योग्य आहे काय? आपण पूर्णपणे निश्चित होऊ शकत नाही, कारण लिलाव विजेता अज्ञात असतो. सहसा हे खरेदीदार खूप श्रीमंत असतात, जे अशाप्रकारे अज्ञात राहणे पसंत करतात.