राज्यात सर्वाधिक मतांनी जिंकलेले 5 पैकी 4 उमेदवार आघाडीचे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – राज्यातील विभानसभेच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झालंय. यामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे पहिले तीनही नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. मात्र ‘अब की बार 220 पार’ म्हणणाऱ्या महायुतीच्या फक्त एका उमेदवाराला एक लाखाच्या मताधिक्याचा आकडा पार करता आला आहे.

सर्वाधिक मतांनी जिंकलेल्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आहेत. त्यांनी बारामतीतून १ लाख ६५ हजार मताधिक्य मिळवलं आहे. त्यांच्यानंतर नंबर लागतो तो काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा, त्यांना १ लाख ६२ हजारांचं मताधिक्य मिळालंय. तिसऱ्या नंबरवर आहेत भाजपचे किसन कथोरे, त्यांना मुरबाडमध्ये १ लाख ३७ हजारांचं मताधिक्य मिळालंय. त्यांच्या नंतर धीरज देशमुख यांचा नंबर लागतो. त्यांना लातूर ग्रामीणमधून १ लाख १९ हजारांचं मताधिक्य मिळालं आहे. पाचव्या क्रमांकावर भोकरमधून काँग्रेसचे अशोक चव्हाण आहेत, त्यांना 97 हजार 445 इतकं मताधिक्य मिळालंय.

दरम्यान, भाजपकडून बोरीवली मतदारसंघातून विनोद तावडेंऐवजी तिकिट दिलेल्या सुनिल राणेंना 97 हजार 445 मताधिक्य मिळालं आहे.

Visit : Policenama.com