Coronavirus : धक्कादायक ! आणखी एका पोलिस हवालदाराचा ‘कोरोना’मुळं मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं संपुर्ण जगभरात थैमान घातलं आहे. देशात आणि महाराष्ट्रात देखील कोरोनाचा हाहाकार चालु आहे. राज्यात देखील सर्वच ठिकाणी चिंताजनक स्थिती आहे. काही प्रमाणात कोरोनाबाधित रूग्ण बरे देखील होत आहेत. काल (शनिवार) मुंबई पोलिस दलातील एका कर्मचार्‍याचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. आज पुन्हा मुंबई पोलिस दलातील एका 52 वर्षीय पोलिस हवालदाराचा कोरोनामुळं मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याबाबत मुंबई पोलिसांनी सोशल मिडीयाव्दारे माहिती दिली आहे.

Advt.

52 वर्षाच्या पोलिस हवालदाराचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. काल देखील एका 57 वर्षीय पोलिसाचा मुंबईत मृत्यू झाला होता. मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. मुंबईत 4 हजाराहून अधिक तर पुण्यात 1 हजाराहून अधिक कोरोनाबाधित आहेत. कोरोनामुळं आतापर्यंत 2 पोलिस कर्मचार्‍यांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण 64 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती काही दिवसांपुर्वी समोर आली होती.