मंत्रिमंडळ बैठकीतील ‘हे’ ७ महत्वपुर्ण निर्णय, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१६) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. युद्ध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशातील सर्वच क्षेत्रांतर्गत सुरेक्षा मोहिमेत, चकमकीत किंवा देशाबाहेरील मोहिमेत धारातिर्थी पडलेल्या आणि अपंगत्व आलेल्या जवानांना देण्यात येणाऱ्या एकरकमी अनुदानात भरीव वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळातील निर्णय :

१. समग्र शिक्षा अंतर्गत कार्य़रत असणाऱ्या विशेष शिक्षकांच्या मानधनाच्या फरकातील रक्कम राज्याच्या निधीतून देण्यास मान्यता.

२. शासकीय तंत्रनिकेतन गोंदिया आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड यांना ७ हजार ६०० पेक्षा जास्त ग्रेड वेतन असलेल्या पदांच्या निर्मितीस मान्यता.

३. राष्ट्रीय आधुनिक कला संग्राहलयास राज्य सरकारने दिलेल्या फोर्ट महसूल विभागातील मिळकतींच्या नुतनी करणास मान्यता. नुतनीकरण करताना नाममात्र शुल्क आकारणी.

४. औरंगाबाद येथील कांचनवाडी येथील ३३ एकर वाल्मीची ३३ एकर जमीने राष्ट्रीय विधि विद्यापीठास देण्यात येणार.

५. विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे नाव इतर मासागवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग असे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

६. विधि व न्याय विभाग, मंत्रालय (खुद्द) यांच्या आस्थापनेवर विधि सल्लागार-नि-सहसचिव तसेच प्रारुपकार-नि-सहसचिव या संवर्गात प्रत्येकी एक अशी एकूण दोन पदे नव्याने निर्माण करण्यास मान्यता.

७. महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी चार हजार कोटींचे अंतरिम कर्ज उभारण्यासाठी शासन हमी देण्यास मान्यता.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like