Budget 2019 : बजेटमधील ‘या’ ९ गोष्टी तुमच्या अत्यंत कामाच्या, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या अर्थसंकल्पाने सर्वांना खर्च करण्यासाठी प्रेरित केले आहे. यासाठी केंद्र सरकारने अनेक करातून सूट देखील दिली आहे. सामान्य माणसांसाठी नियमात अनेक बदल केले आहेत. त्यामुळे तुम्ही अनेक करातून सूटका मिळवू शकतात आणि बदललेल्या नियमांना तुमच्या जीवनावर परिणाम देखील होऊ शकतो.

१. ४५ लाखापर्यंतच्या घर खरेदीसाठी घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजावर आयकरातून सूट मिळणार आहे, ही सूट २ लाखावरुन वाढवून ३.५ लाख रुपये करण्यात आली आहे. यांचा लाभ ते घेऊ शकतात जे ३१ मार्च २०२० पूर्वी गृहकर्ज घेतली.

२. जर तुम्ही ३१ मार्च २०३० पर्यंत कर्ज घेऊन इलेक्ट्रिक वाहन खरेदी कराल तर तुम्हाला १.५० लाख रुपयांपर्यंतच्या व्याजवर कोणताही कर लागणार नाही.

३. ३१ मार्च २०२१ आधी दर तुम्ही आपली संपत्ती विकून स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करत असाल तर या संपत्तीतून मिळणाऱ्या लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स वर कोणताही कर लागणार नाही.

४. नॅशनल पेंशन स्कीम (एनपीएस) मध्ये देखील करात सूट वाढवण्यात आली आहे. आता ६० टक्के पैसे काढल्यास त्यावर कोणताही कर लागणार नाही.

५. केंद्र सरकारने आयकर भरण्यासाठी आवश्यक असलेल्या पॅन कार्डची आवश्यकता संपणार असून आता आधार कार्डच्या आधारे तुम्ही आयकर भरु शकतात.

६. आयकर भरण्यासाठी आता त्रस्त होण्याची गरज नाही, कारण आयकर विभाग तुम्हाला पहिल्यापासून भरलेला आयकर फॉर्म देण्यात येईल. त्यात तुमच्या आय, गुंतवणूक सर्वाची महिती भरलेली असेल.

७. २ ते ५ कोटी रुपयांवर ३ टक्क्यांचा सरचार्ज वाढवण्यात येईल. ज्यांचे उप्तन्न ५ कोटी रुपयांपेक्षा आधिक असेल तर ७ टक्के सरचार्ज भरावा लागेल.

८. दर तुम्ही परदेशात राहत असलेेल्या आपल्या नातेवाईकांना ५० हजार रुपयांपर्यंत किंवा आधिक संपत्तीची रोख हस्तांतरण कराल तर प्राप्त कर्तांना आता कर भरावा लागेल.

९. जर तुमची काराची सीमा ठरलेल्या सीमापेक्षा कमी असेल तर तुम्हाला खालील प्रमाणे आयटीआय दाखल करावा लागेत.
– तुम्ही चालू खात्यात १ वर्षात १ कोटीपेक्षा आधिक रक्कम जमा केली असेल.
– जर तुम्ही परदेशी प्रवासात १ वर्षात २ लाख रुपयांपेक्षा आधिक खर्च केला असेल.
– जर तुम्ही १ वर्षात १ लाख रुपयांपेक्षा आधिक वीज बील भरले असेल.
– जर तुम्ही संपत्तीची विक्री किंवा गुंतवणूकीतून लॉन्ग टर्म कॅपिटल जमा केले असेल.

सिनेजगत बातम्या
दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !