‘आप’ विधानसभेच्या रिंगणात, अरविंद केजरीवाल करणार प्रचार !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणूक जवळ आल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून विविध यंत्रांच्या माध्यमातून त्याचबरोबर भेटीगाठी घेऊन हा प्रचार केला जात आहे. त्यानंतर आता दिल्लीमध्ये सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने देखील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.

साधारणतः महिना दीड महिन्यानंतर होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्ये आप आपले उमेदवार देणार असून यासाठी पक्षाच्या वतीने निवडणूक समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. त्याचबरोबर या निवडणूक प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल हे स्वतः येणार आहेत. राज्यातील भाजप सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले असून या सरकारला खाली खेचण्यासाठी आम्ही या निवडणुकीत उतरणार असल्याचे महाराष्ट्रातील ‘आप’ चे प्रदेश प्रभारी दुर्गेश पाठक यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका केली. त्यामुळे आता पुन्हा एकदा परिवर्तनासाठी आम्ही मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरामुळे ‘आप’ ला उमेदवार मिळतात कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like