हिंगोली जिल्ह्यातील फरार आरोपी चंदननगर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील जीवे मारण्याच्या प्रयत्न प्रकरणी दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून पसार असलेल्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील रामकिसन देसाई (२७, चुडावा, ता. पुर्णा, जि. परभणी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला वसमत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक अंबरिश देशमुख याना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्य़ात दाखल गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेला तरुण पुण्यात वेशांतर करून राहात आहे. तो सध्या गणेशनगर चौकात उभा आहे. त्यानुसार त्यांनी पथकासह त्याला तेथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो वसमत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असल्याची खात्री झाली. त्यानंतर वसमत पोलीसांशी संपर्क साधून त्यांना पोलीस हवालदार बी. व्ही. मिरासे, पोलीस शिपाई एस. पी. सुरुशे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंबरिश देशमुख, कर्मचारी चेतन गायकवाड, जितेंद्र कोळी यांच्या पथकाने केली आहे.

ह्याहि बातम्या वाचा

मी कोणत्याही तरुणाला आमदार बनवू शकतो …!

‘भाजपा सरकारने मसूदला हिंदुस्थानातून पाकिस्तानात पाठवलं नव्हतं का ?’ : राहुल गांधी

मी भाजपच्या लावारीस पोरांनी केलेल्या ट्रोलींगला भीक घालत नाही

मौजमजेसाठी जबरी चोरी आणि वाहनचोरी करणाऱ्या दोघांना अटक

आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणारे नरेंद्र मोदी आहेत कोण ?