अपहरण, खंडणी प्रकरणातील फरार आरोपी गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – अपहरण करुन ४० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट-४ च्या पथकाने प्रणव पांडुरंग आघाव याला साडेसतरा नळी येथून अटक केली. तर खंडणी विरोधी पथाकाने इंद्रजित कासार याला त्याच्या अहमदनगर तालुक्यातील मुळगाव वाळकी येथून अटक केली. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी पाच वर्षापासून फरार होते. या गुन्ह्यात यापूर्वी ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आरोपींवर २०१४ साली एका व्यक्तीचे अपहरण करून त्यांच्या पत्नीकडे ४० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली होती. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रणव आणि इंद्रजीत फरार झाले होते. पाच वर्षापासून पोलीस त्यांच्या मागावर होते.

प्रणव आघाव हा हडपसर येथील साडेसतरा नळी येथे थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस कर्मचारी गणेश साळुंके यांना समजली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपी प्रणव आघाव याला अटक केली. तर खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार यांना इंद्रजीत कासार हा त्याच्या मुळ गावी आला असल्याची माहिती मिळाली. खंडणी विरोधी पथकाने त्याच्या मुळगाव वाळकी येथून अटक केली. आरोपींनी पुढील कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. इंद्रजीत कासार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त गुन्हे शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, अंजुम बागवान, पोलीस उप निरीक्षक निखील पवार, पोलीस कर्मचारी गणेश साळुंके, अब्दुल करीम सैय्यद, शंकर पाटील, सुरेंद्र साबळे, राकेश खुणवे, फिरोज बागवान, अमोल पिलाणे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like