खंडणीच्या गुन्ह्यातील शरद मोहळ टोळीतील फरार आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

चाकूचा धाक दाखवून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या शरद मोहळ टोळीतील फरार सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने ही कारवाई कोथरुड येथील साई गणेश मंडळ या ठिकाणी केली. अटक करण्यात आलेला आरोपी चार वर्षांपासून फरार होता.
[amazon_link asins=’B009WNA9V6,B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’979d5857-b1d2-11e8-a096-ff1a2639e8f6′]

रामदास उर्फ राम तुकाराम खोपकर (वय-३० रा. मौजे. मुठा. ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अनिल घेवरचंद संघवी यांनी २६ मार्च २०१४ मध्ये खोपकर विरुद्ध फिर्याद दिली होती.

खोपकर हा शरद मोहळ टोळीचा सदस्य असून त्याने अनिल संघवी यांना २६ मार्च २०१४ मध्ये सायंकाळी सातच्या सुमारास चाकुचा धाक दाखवून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. या गुन्ह्यामध्ये खोपकर हा चार वर्षांपासून फरार होता. पुणे पोलीस त्याच्या मागावर होते मात्र तो सापडत नव्हता.

खोपकर हा कोथरुड येथील साई गणेश मंडळ सुतारदरा येथे येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमोल पवार यांना मिळाली. दरोडा प्रतिबंधक पथकाने सुतारदरा येथे सापळा रचून खोपकर याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या खोपकरवर दोन खंडणीचे व इतर गंभीर गुन्हे पौड पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
[amazon_link asins=’B0073C7IIK,B00DRLASZ6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d69e008-b1d2-11e8-87be-59089ebb9d2a’]

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -१ समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस फौजदार शंकर पाटील, अजय थोरात, रामदास गोणते, अमोल पवार, विल्सन डिसोझा यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

वाचाळवीर राम कदम यांचे प्रवक्‍ते पद धोक्यात

डॉ. दाभोलकर हत्याप्रकरण : मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणेला फटकारले 

तरुणाच्या खून प्रकरणात युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला अटक

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी 

मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

जिल्हाधिकारी कार्यालतून महिला तहसीलदारांची पर्स चोरीला 

जाहिरात