‘फेसबुक लाईव्ह’च्या नादात भीषण अपघात होऊन जीवितहानी झाल्याचा अंदाज 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर कार्ला फाटा येथे रविवारी झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. एका कारमधून जात असलेल्या सहा तरूण फेसबुक लाईव्ह करत असल्याचे बोलले जात आहे. अतिवेगात कार चालवत असताना, फेसबुक लाईव्ह सुरू होते, याच दरम्यान लक्ष विचलित होऊन चालकाचा ताबा सुटला आणि भीषण अपघात झाला. कार रस्ता दुभाजकावर आदळून दुसऱ्या लेनवरून जाणाऱ्या कारला धडकली. अपघाताची चौकशी पोलीस करत आहेत. हा भीषण अपघात रविवारी दुपारी जुन्या पुणे मुंबई महामार्गावर कार्ला फाट्याजवळ झाला.’फेसबुक लाईव्ह’च्या नादात भीषण अपघात होऊन जीवितहानी झाल्याचा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

[amazon_link asins=’B00N1Q5WYO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d0b45b2b-88bc-11e8-af84-e9f370a2355e’]

पुण्यावरून येणारी कार भरधाव वेगात होती. चालकाचे गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि ही कार डिव्हायडर तोडून बाजूच्या लेनवर धडकल्याची माहिती पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात सात जण जागीच ठार झाले. हा अपघाच एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. स्विफ्ट कार पुण्याहून मुंबईकडे (एम एच 14 / सी एक्स 8339) येत होती तर सॅण्ट्रो (एम एच 12 / ई एक्स 1682) मुंबईहून पुण्याकडे जात होती.

सॅण्ट्रो कार मधले प्रवासी – राजीव जगन्नाथ बहिरट, सोनाली बहिरट, जान्हवी बहिरट, जगन्नाथ बहिरट हे पुण्यातील बी.टी. कवडे रोड मुंढवा येथील रहिवासी होते तर स्विफ्ट कार मधले प्रवासी – संजिव कशवाह, कृष्णा शिरसाठ, निखिल सरोदे हे सर्व पिंपरी चिंचवड मधील अमरदिप कॉलनी रहाटणी परिसरातील रहिवासी होते. या अपघातात जखमी झालेले प्रतिक सरोदे, आकाश मदने, रोहित कड, किशोर मूल हे पिंपरीतील रहिवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सहा मित्र स्विफ्ट कारमधून लोणावळ्याच्या दिशेने जात होते. कारमध्ये तरुणांची दंगा मस्ती सुरू होती. फेसबुक लाईव्ह सुरू होते. वेगात कार चालवत चालक फेसबुक लाईव्ह करत होता. दरम्यान स्विफ्ट कार (एम एच 14 / सी एक्स 8339) कार्ला फाट्याजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडर तोडून विरुद्ध लेनवर गेली. दरम्यान नियंत्रण सुटलेली स्विफ्ट मुंबईहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या सँट्रो कारला (एम एच 12 / ई एक्स 1682) धडकली. दोन्ही कारचा वेग जास्त असल्याने दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात स्विफ्ट कार मधील 3 जण तर सँट्रो कार मधील 4 जण जागीच ठार झाले आहेत. तर सँट्रो कारमधील दोन जणांना गंभीर दुखापत झाली आहे.

सँट्रो कारमधील बहिरट कुटुंबीय फॅमिली गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी दोन कार मधून लोणावळ्याला गेले होते. लोणावळ्याहून कार्यक्रम उरकून परत येत असताना हा अपघात झाला.

काही महिन्यांपूर्वी पिंपरी येथे ग्रेडसेप्रेटर मध्येही अपघात होऊन दोन तरुणाचा मृत्यू झाला होता. अतिवेगात सुमारे २०० च्या स्पीडने कार चालवून ते आपल्या मित्राना ‘इन्स्ट्राग्राम’द्वारे लाइव्ह दाखवत होते.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दोन कारच्या भीषण अपघात पाच जणांचा मृत्यू