पिस्टलसह आरोपी जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला बीड स्थानीक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.१६) बार्शीनाका ते पाली रोडरवडील हॉटेल चंद्रलोक येथे करण्यात आली. आरोपीकडून २५ हजार रुपये किंमतीचे पिस्टल आणि एक हजार रुपये किंमतीचे दोन काडतुसे असा एकूण २६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी राहुल प्रकाश तुपे (वय-२२ रा. गोविंदनगर, आशा टॉकीजजवळ, बीड) याला अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बीड ते पाली रोडवर गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्यावेळी राहुल तुपे याच्याकडे पिस्टल असून तो हॉटेल चंद्रलोक येथे बसला असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने या ठिकाणी सापळा रचून तुपेला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला आडकवलेली पिस्टल सापडली. पोलिसांनी तुपेला अटक करुन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनशाम पाळवदे, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, दत्ता गलधर, श्रीमंत उबाळे, दत्ता दुधाळ, विष्णु चव्हाण, नरेंद्र बांगर यांच्या पथकाने केली.

You might also like