आरोपींसोबत पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध : तिघांची वेतनवाढ रोखली तर दोघे बडतर्फ 

नगर : पोलिसनामा ऑनलाईन 

आरोपींशी सख्य ठेवल्याचा ठपका ठेवून नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तोतयागिरी करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची एक वर्ष  वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. यावेळी जितेंद्र गायकवाड व शब्बीर शेख यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

नगर जिल्ह्यातील पांगरमल विषारी दारुकांडात १४ जणांचा मृत्यु झाला होता. जिल्हा रुग्णालयाती कँटीनमध्ये विषारी दारुची निर्मिती करणाऱ्या या आरोपींसोबत पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप करण्यात आले होते त्यावरुन काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्यानुसार श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करुन त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे दिला होता. त्यावरुन या पाच जणांना पोलीस खात्यातून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बचावण्यात आली होती त्यांना १५ दिवसात म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष भेटून आणि निवेदनाद्वारे हकीकत कथन केली. ती पोलीस अधीक्षक शर्मा यांना समाधानकारक वाटल्याने त्यांनी तिघांची बडतर्फची नोटीस मागे घेतली.

[amazon_link asins=’B077S1SNC4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’99ea1ec9-7db5-11e8-ab6f-e3877b052069′]

हवालदार भानूदास बांदल, हेडकाँस्टेबल आदिनाथ गांधले, सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी एक वर्षाकरीता वेतनवाढ स्थगित करण्याची शिक्षा सुनावली.

पांगरमल दारूकांड प्रकरणातील एका आरोपीसोबत स्थानिक गुन्हे शाखेतील तत्कालीन कर्मचारी जितेंद्र गायकवाड व तोफखाना पोलिस ठाण्यातील कर्मचारी शब्बीर शेख यांचे अमर्यादित कॉल झाले होते. जितेंद्र गायकवाड व शब्बीर शेख यांची उत्तरे समाधानकारक न वाटल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.