फिल्मी स्टाईलने सराईत गुन्हेगाराचे पलायन ; पोलीसांची धावपळ

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – नांदेड शहरातील इतवारा पोलीस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीने शौचालयाच्या मागील खिडकीतून पलायन केले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. ही घटना शुक्रवारी इतवारा पोलीस ठाण्यात घडली.

शेख मोहम्मद मुजाहिद शेख मोहम्मद हाजी (वय २०, रा. साईनगर, इतवारा) असे आरोपीचे नाव आहे. शेख सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

‘ही माझी शिकार’ म्हणत पाकिस्तानी विमानाचे ८६ सेकंदात उडविले चिथडे 

शुक्रवारी दुपारी साडे चारच्या सुमारास त्याने ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला शौचास जायचे आहे असे सांगितले. त्यानंतर कर्मचारी त्याला ठाण्यातील शौचालयाकडे घेवून गेले. पोलीस कर्मचारी शौचालयाबाहेर पहारा देत होते. त्याचवेळी आरोपी शेख मोहम्मद मुजाहिद याने शौचालयाच्या पाठीमागील खिडकीच्या काचा काढून त्यातून बाहेर उडी घेत पळ काढला. बराचवेळ आरोपी शौचालयातून बाहेर न आल्यामुळे पहारा देणाऱ्या पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी लगेच शौचालयाची तपासणी केली असता, आरोपीने पलायन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या प्रकाराची माहिती वरिष्ठांना कळविली. आरोपीने पलायन केल्याची माहिती पोलीस ठाण्यातील इतर कर्मचाऱ्यांना समजताच एकच धावपळ उडाली. पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी आता पथके रवाना केली आहेत. आरोपीने पांढऱ्या रंगाचा शर्ट व गडद रंगाची पॅन्ट घातली आहे. पाच फूट उंचीच्या या आरोपीला नशा करण्याची सवय आहे.

Loading...
You might also like