काेरेगांव भीमा अांदाेलन भडकावण्यासाठी पाच लाखाचे फंडिंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

देशभरात सुरु असलेल्या नक्षली संबंधाच्या कारवाईवरुन महाराष्ट्र पोलिसांनी मोठ्या गौप्यस्फोट केला आहे. अटकेतील सर्वांचे नक्षलवाद्यांशी संबंध होते. तसेच त्यांचे जम्मू काश्मीरमधील फुटीरवाद्यांशी संबंध असल्याचे कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले असल्याचे अप्पर पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती  दिली. इतकंच नाही तर माओवाद्यांचा सरकारविरोधी युद्ध पुकारुन, सरकार उलथवण्याचा डाव होता, असा दावाही पोलिसांनी केला. दरम्यान काेरेगांव भीमा आंदाेलन भडकावण्यासाठी पाच लाख रुपयाचे फंडिंग माअाेवाद्यांनी केले असल्याचे देखील पत्र पाेलिसांच्या हाती लागले आहे.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f20b8735-ad0a-11e8-a571-3ff05f3c6689′]

लेखक वरवर राव, अरुण परेरा, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा आणि वरनॉन गोन्साल्वीस यांच्यावरील कारवाई योग्य असल्याचंही परमवीर सिंह यांनी म्हटलं.

या पाचही जणांच्या घरी टाकलेल्या छाप्यात अनेक महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. त्याची न्यायवैद्यक तपासणी सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच काही कॅम्प्यूटर्स, लॅपटॉपचे पासवर्ड मिळवले असून, या सर्व कागदपत्रांवरुन मोठा शस्त्रसाठा विकत घेणं, पंतप्रधान मोदींची हत्या आणि मोदी सरकार उलथवण्याचा कट होता, हे स्पष्ट होत असल्याचंही सिंह यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

मुक्‍ता दाभोळकर, जितेंद्र आव्‍हाड होते निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा 

या पत्रकार परिषदेत पोलिसांनी जप्त केलेली पत्रं वाचून दाखवली. यामध्ये कॉम्रेड सुधा भारद्वाज, मिलिंद तेलतुंबडे, रोना विल्सन यांच्या पत्रांचा समावेश होता. या पत्रांमध्ये नक्षलवादी चळवळीसाठी कसा प्लॅन करता येईल, पैशाचा पुरवठा, पैशाची मागणी, हत्यारा याबाबतचा उल्लेख असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

विविध स्तरांवरून नक्षलवादी कारवायांसाठी पैशाचा पुरवठा झाल्याची हजारो पत्रे आमच्या हाती लागली आहेत. तसेच फरार नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे आणि रोना विल्सन यांच्यात झालेल्या पत्रव्यवहारामध्ये नक्षली कारवायांबाबत थेट उल्लेख असल्याचेही उघड झाले आहे, अशी माहितीही अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी दिली.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b8b55bb-ad0b-11e8-93da-3b58cef1e65c’]

जेएनयूमधील विद्यार्थ्यांना नक्षलवादाकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, असेही तपासात उघड झाले आहे. तपासादरम्यान रोना विल्सन यांनी पासवर्ड टाकून लॉक केलेले एक पत्रही हस्तगत करण्यात आले आहे.  तसेच रोना विल्सन यांनी कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलेल्या पत्रामधून राजीव गांधींसारखा घातपात करण्याचा आणि चार लाख राउंड, ग्रेनेड आणि 8 कोटी रुपयांचा समावेश असल्याचा उल्लेख आहे. असेही पोलिसांनी यावेळी सांगितले.

देशाविरुद्ध मोठे षडयंत्र रचण्याची जबाबदारी या कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली होती. त्यांचे काम सीपीआएमला वेळोवेळी कळवण्यात येत होते.  पोलिसांना पुरावे मिळाल्यानंतरच अटक सत्र करण्यात आले होते असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यासह देशात करण्यात आलेल्या छापामारीचे शूटिंग करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9148258e-ad0b-11e8-8336-39d458c6bc6b’]

नक्षल संबंधावरुन अटक, पुणे पोलिसांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

जम्मू काश्मीरमध्ये आरोपींचे फुटीरतवाद्यांशी संबंध असलेले काही कागदपत्र आमच्याकडे आहे : पोलिस
काश्मीर, मणिपूरमधील फुटीरतावाद्यांशीही संपर्क साधल्याचे पुरावे – पोलीस
नक्षली कारवायांसाठी विविध स्तरावरुन पैशाचा पुरवठा, हजारो पत्र आहेत- पोलीस
शहरी नक्षलवाद नवा नाही, मी 20 वर्षापूर्वी चंद्रपूर-भंडाऱ्यात काम केलंय, तेव्हापासून शहरी नक्षलवादाविरोधात काम – पोलीस
फरार असलेल्या मिलिंद तेलतुंबडेने रोना विल्सनला लिहिलेल्या पत्रात नक्षली कारवांयाबाबत थेट उल्लेख – पोलीस
जेएनयूमधूनही विद्यार्थ्यांना नक्षलवादी चळवळींकडे वळवण्याचा प्रयत्न – पोलीस
हजारो पत्रं मिळाली, ज्यामध्ये नक्षलवाद्यांना मदत होत होती, हे सिद्ध होतंय – पोलीस
रोना विल्सन यांचं पासवर्ड संरक्षित पत्रही हाती लागलं, त्यातून महत्त्वाचे खुलासे – पोलीस
रोना विल्सन यांनी 4 लाख राऊंड, ग्रेनेड आणि 8 कोटी रुपयांचा उल्लेख असलेलं पत्र कॉम्रेड प्रकाश यांना लिहिलं होतं. यामध्ये राजीव गांधीसारखा घातपाताचा उल्लेख – पोलीस
कॉ. सुदर्शन यांनी कॉम्रेड गौतम नवलखा यांना लिहिलेलं पत्रही पोलिसांनी वाचून दाखवलं
कॉ. सुधा भारद्वाज यांचं संशयास्पद पत्र पोलिसांनी वाचून दाखवलं
नक्षल संबंधावरुन 29 तारखेला देशभरात छापेमारी केली, त्यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र मिळाली – पुणे पोलीस

Please Subscribe Us On You Tube