त्यांनी एटीएसला पळविले ४० हजार किमी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

सुजीतकुमार आणि भरत कुरणे या दोघांना एटीएसने कर्नाटक एसआयटीकडून ताबा घेतला. तपासासाठी या दोघांनी एटीएसला गेल्या ७ दिवसात तब्बल ४० हजार किलोमीटर पळविले. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून  त्यांनी दिलेल्या माहितीवरून तपास करण्यासाठी एटीएसने, सांगली, बीड, कर्नाटकात प्रवास केला. यामुळे त्यांना तपास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. म्हणून एटीएसच्या दोघांच्या कोठडीत जास्तीतजास्त वाढ करण्याची मागणी केली.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1df7e7ef-baf5-11e8-804f-df56afc4b305′]

पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने (एसआयटी) अटक केलेल्या आरोपींपैकी के. टी. नवीनकुमार याच्या नावावरील सिम कार्ड आरोपी सुजीत कुमार उर्फ प्रवीणने वापरल्याची माहिती एटीएसच्या तपासात उघड झाली. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात अटक केलेल्या आरोपी वैभव राऊतच्या चौकशीतून सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांची नावे समोर येताच, एटीएसने कर्नाटक एसआयटीकडून दोघांचा ताबा घेतला. १२ सप्टेंबरला त्यांना बेड्या ठोकल्या. संघाचे कार्यकर्ते असलेले दोघेही अन्य हिंदुत्ववाद्यांच्या संपर्कात होते. यातील सुजीतने गेल्या वर्षभरात ४८ मोबाइल्स वापरले. त्याच्याजवळून तीन मोबाइल आणि दोन सिम कार्ड जप्त करण्यात आले. यातील एक सिम कार्ड नवीनकुमारच्या नावावर होते.

पुण्यातील सनबर्न फेस्टिवल आरोपींच्या टार्गेटवर असल्याने गेल्या वर्षीच्या २६ डिसेंबरला सुजीत कुमार हेच सिम कार्ड असलेला मोबाइल घेऊन साताऱ्यात आला. त्यानंतर त्याने मोबाइल बंद केला. तो गोंधळेकर याच्या पुण्यातील पर्वती परिसरातील कार्यालयात गेला. पुढे ३१ तारखेला पुन्हा साताऱ्यात गेला आणि त्याने मोबाइल सुरू केला, तर भरत कुरणे हा २७ तारखेला साताऱ्यात आला. त्यानेही फोन बंद केला. त्याचा मोबाइल ३० तारखेला सुरू झाल्याची माहिती एटीएसने न्यायालयात दिली.

दाभोलकर हत्याकांडातील दुचाकीची बीडमध्ये विल्हेवाट

गेल्या पाच दिवसांत एटीएसने काहीही तपास केला नसून, फक्त सिम कार्डवरुन तपास सुरू आहे. जणू ते एका व्यक्तीची चौकशी करत असल्यासारखे दिसते. सुजीत कुमारकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात मोबाइल सापडले नसून, लंकेश हत्याप्रकरणातील एकूण मोबाइलचा तो आकडा असल्याची माहिती आरोपींचे अ‍ॅड संजीव पुन्हाळेकर यांनी न्यायालयात दिली.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नग्न करून मारले

गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी सुजीत कुमार आणि भरत कुरणे यांना नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी अटक केली. दोघांना वाढीव कोठडीसाठी सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने दोघांकडे काही तक्रार आहे का? असे विचारताच, कुमारने एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नग्न करून बेल्ट आणि काठीने मारहाण केल्याचा आरोप केला. तेव्हा न्यायालयात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. त्याची तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी केली. मात्र, त्याच्या अंगावर कुठल्याही स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या नाहीत. यामुळे न्यायालयात मात्र गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळानंतर दोघेही तपासात सहकार्य करत नसल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. त्यानुसार, त्यांच्या कोठडीत न्यायालयाने २५ तारखेपर्यंत वाढ केली.

भरत कुरणेच्या फार्महाउसवर प्रशिक्षण

भरत कुरणे याच्या फार्म हाउसवर अन्य आरोपींना शस्त्र चालविण्यासह बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले. एटीएसने स्फोटकांप्रकरणी जालना येथून गणेश कपाळेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. याच धक्क्याने त्याच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला. प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने एटीएसने रागात कुमारला टार्गेट केले आणि त्याला मारहाण केल्याचा आरोप अ‍ॅड संजीव पुनाळेकर यांनी केला आहे.

[amazon_link asins=’B01J82IYLW,B074ZF7PVZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5e2c41f4-baf6-11e8-a2fe-e7d54cc7ee26′]