अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीची कारागृहात आत्महत्या

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

 

अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने कारागृहामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज (बुधवार) सकाळी उस्मानाबाद जिल्हा कारगृहात घडला. आत्महत्या केलेला आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमुळे जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत होता. या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना समोर येताच कारागृहात एकच खळबळ उडाली.

IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाईड नोटही सापडली 

[amazon_link asins=’B07B4S1GLV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’867fb858-b105-11e8-8fc5-a1d4eb666e63′]

योगेश उर्फ रूद्र शिवाजी शिंपले (वय-१८ रा़ चोंदे गल्ली, कळंब जि़उस्मानाबाद)  असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिंपले याच्याविरूध्द कळंब पोलीस ठाण्यात अत्याचार प्रकरणी १५ मे रोजी गुन्हा दाखल होता. पोलिसांनी योगेश शिंपले याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळे योगेश शिंपले याला उस्मानाबाद येथील जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. कारागृहात आज सकाळी नेहमीप्रमाणे सर्व कैद्यांना प्रात:विधी, अंघोळीसाठी सोडण्यात आले होते. इतर कैदी प्रात:विधी, अंघोळ करून नाष्ट्यासाठी गेले होते. मात्र, त्याच वेळी योगेश शिंपले याने कारागृहातील सांस्कृतिक हॉलमधील लोखंडी अँगलला टी शर्टने गळफस घेतला.

जेष्ठ अभिनेते ‘दिलीप कुमार’ लीलावती रुग्णालयात दाखल  

घटनेची माहिती मिळताच मुख्य न्याय दंडाधिकारी पोटे, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, पोलीस उप निरीक्षक दादासाहेब सिध्दे यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पंचनाम्यानंतर मृतदेह सोलापूर येथील रूग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

जाहिरात