ब्रेकिंग : आरोपीचा पोलिसांवर गोळीबार, एक पोलीस गंभीर जखमी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर आरोपीने गोळीबार केला. यात गोळी लागून एक पोलिस जखमी झाला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याचा साथीदार पसार झाला. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राहाता येथे ही घटना घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अजित पठारे (नेमणूक- राहाता पोलीस स्टेशन) हे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, मंगळसूत्र चोरीतील संशयित आरोपीला पकडण्यासाठी राहाता पोलीस गेले होते. पोलीस पकडण्यासाठी आल्याचे पाहून आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. यात एक पोलिस जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला गोळी लागल्याने उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांनी सचिन ताके नावाच्या आरोपीला अटक केली आहे. त्याचा साथीदार पळून गेला आहे.

गोळीबाराची घटना घडताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेसह राहाता पोलिसांकडून पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Visit :  Policenama.com