दरोड्यातील पाहिजे असलेला आरोपी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक कोयता जप्त केला आहे.

रोहित तानाजी सोनकांबळे (वय २०, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलिसांचे पथक हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबवित होते. त्यावेळी गस्त घालत असताना पोलीस नाईक गायकवाड आणि शिवले यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी रोहित सोनकांबळे हा फुरसुंगी गंगानगर येथील रिक्षा स्टॅंडजवळ उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याची झडती घेतल्यावर पोलिसांनी एक कोयता जप्त केला आहे.

रोहित सोनकांबळे हा अप्पर इंदिरानगर येथे इंदलकर यांच्या घरात भाड्याने राहात होता. त्याला १० जून रोजी अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आय़ुकत् सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, प्रसाद लोणारे, कर्मचारी युसुफ पठाण, राजेश नवले, प्रताप गायकवाड, टिळेकर, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, अकबर शेख यांच्या पथकाने केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like