बँकेची फसवणूक करून ९ महिन्यांपासून फरार असलेला अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार असलेल्या एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

विठ्ठल अनंता घोरपडे (३७, आंबेगाव, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गुरव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल फसवणूकीच्या गुन्ह्यात नऊ महिन्यांपासून फरार असलेला एकजण कात्रज येथील मोरेबाग चौकात उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे जाऊन संशयितरित्या फिरणाऱ्या घोरपडे याला हटकले. त्यानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी त्याला पोलिसांनी पकडले. तो मागील नऊ महिन्यांपासून पोलिसांना सापडत नव्हता. त्याला अटक करून स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त व्ही. पी. नांदेडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विष्णू ताम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदिप गुरव, पोलीस कर्मचारी विनोद भंडलकर, गणेश सुतार, उज्ज्वल मोकाशी, प्रणव सकपाळ, शिवदत्त गायकवाड, जगदीश खेडेकर यांच्या पथकाने केली.