‘डायरेक्टर सेटवर माझ्यासमोर करीत होता ते कृत्य’ : लाराने पती महेशला संगितली लज्जास्पद घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता हिचा आज वाढदिवस आहे, तिचा जन्म १६ एप्रिल रोजी गाजियाबाद मध्ये झाला होता. २००० मधे मिस युनिव्हर्सचा खिताब पटकवला होता. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. तसे पहायला गेले तर तिच्या अभिनयाचा ग्राफ इतका उचंवलेला नाही. पण
चंदेरी दुनियेत आपली वेगळी ओळख निर्मण करताना विशेषतः अभिनेत्रींना खडतर प्रवासाचा सामना करावा लागतो. याचे अनेक किस्से आपण पहिले आणि ऐकले आहेत. असाच काही किस्सा लाराने ही बाब आपला पती महेश भूपती यांना सांगितली होती.

आपल्याला माहितीच असेल की लारा दत्ता ने दिग्दर्शक साजिद खान यांच्यावर गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. याबाबत लाराचे पती महेश भूपती यांनी मोकळेपणाने बातचीत केली होती. खरेतर साजिद खान यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी #मी टू अंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यावेळीच लाराचे पती महेश भूपती यांनी एक गोष्टी माध्यमांसमोर आणली होती.

महेश यांनी लाराच्या बाबतीत घडलेला किस्सा संगितला होता. ते म्हणाले होते की , ” लाराने माझ्यासमोर एक तक्रार केली होती की साजिद खान सेट वर तिच्यासोबतच्या को को-एक्ट्रेस सोबत अश्लील व्यवहार करीत होता. त्यावेळी आम्ही लंडन मध्ये होतो. त्यावेळी लारा तिची जवळची मैत्रीण जी हेअर ड्रेसर आहे तिच्यासोबत घरी आली होती. आणि या दोघीही साजिद खान यांच्या गैरवर्तनाविषयी तक्रार करीत होत्या.

महेश यांनी पुढे सांगितले की, “मी त्यावेळी देखील लाराला संगितले होते की साजिद काहीतरी चुकीचे करीत आहे आणि तुम्ही शांतपणे ते सहन करीत होता. म्हणूनच या सगळ्या प्रकरणात तुम्ही देखील तितक्याच जबाबदार आहात. यावेळी मी जे बोललो त्याला लारा देखील सहमत होती”.

साजिद खान दिगदर्शित ‘हाउसफुल’ हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट म्हणजे एक रोमँटिक कॉमेडी फिल्म होती. या चित्रपटात अभिनेत्री लारा दत्ता शिवाय अक्षय कुमार , रितेश देशमुख ,दीपिका पादुकोण ,जिया खान आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत होते.

You might also like