पिळदार शरिरयष्टीचा सल्ला पडला महागात

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

पिळदार शरिरयष्टीसाठी प्रत्येक जण काही न काही सल्ला देत असतो. असाच एक सल्ला एकाने दिला. सल्ला चांगला होता मात्र, सल्ला ऐकावा का नाही हे आपल्यावर असत, पण नेमकच विशीत आलेल्या तरुणाने हा सल्ला ऐकला परंतू त्याला हा सल्ला महागात पडला असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.

स्वाईन फ्ल्यूचा आणखी एक बळी; ७२ वर्षीय वृद्ध महिलेच्या मृत्यू

झाले असे की, दिल्लीत राहणाऱ्या २० वर्षीय मुलाला पिळदार शरिरयष्टी बनविण्यासाठी सप्लिमेंटरी पावडर खाण्याच्या सल्ला एकाने दिला. म्हणुन तरुण व त्याचा मित्र सप्लिमेंटरी पावडर घेण्यासाठी एका दुकानात गेले. तिथे जास्त सप्लिमेंटरी पावडर खाणे आरोग्यासाठी हाणीकारक आहे तू जिम ट्रेनरचा सल्ला घे असे दुकानदाराने आरोपीला समजावले. दोघांचे यावर मतभेद झाले व दोघेही तेथून निघून गेले.
[amazon_link asins=’B071NNLMDF,B071JWBFDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’84e54bee-ab90-11e8-ab00-2f839670c0ff’]
थोड्या वेळाने, पुन्हा तो तरुण त्याच दुकानात आला व सप्लिमेंटरी पावडरसाठी कोणते ब्रँड चांगले आहे यांची विचारणा केली. तसेच ते कागदावर लिहुन देण्याची ही विनंती केली. दुकानदाराने लिहायला सुरुवात केली असता, आरोपीने त्याचा हात मुरगळला आणि डोक्याला पिस्तुल लावून धमकी दिली. याचवेळी आरोपीचे दोन मित्र दुकानात शिरले व लाखो रुपयांच्या प्रोटीनची पाकिटे व औषध घेउन पसार झाले. या प्रकरणी दिल्लीतील उत्तर रोहीणी येथील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.