सत्यशोधक शेतकरी संघटनेचे अन्न त्याग आंदोलन

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – स्मृतीशेष साहेबराव आणि मालती करपे यांनी 19 मार्च 1986 साली आत्महत्या केली. आज पर्यत शेतकऱ्यांचे शोषणच होत आहे. शेतकरी आत्महत्या सुरुच आहे. शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ व्हावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मंगळवारी सत्यशोधक शेतकरी संघटनेच्या वतीने अन्नत्याग उपोषण करून काळ्या फिती लावून शासनाचा निषेध करण्यात आला .

धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 ते 5 दरम्यान शेतकरी प्रश्नाकडे शासन दुर्लक्ष करत आहे. या करीता एक दिवस अन्नत्याग करण्यात आला . शेतकऱ्यांना न्याय मिळवा, शेतक-यांच्या विविध 11 रास्त मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी शासनाच्या निषेधात घोषणाहि देण्यात आल्या .काळ्या फिती हाताच्या बाजुला बांधुन हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व सुभाष काकुस्ते ,वंजी गायकवाड,यशवंत मालचे,लालजी गावीत,सुरेश मोरे,बाबु सोनवणे,गोरख कुवर,जितेंद्र महाजन ,शिवाजी मोरे,धर्मा धनगर,सुरेश दावळसे यांनी केले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like