‘अमेरिकन जर्नल’नं केलं मान्य, ‘गंगाजल’ वापरणारे 90 % लोक ‘कोरोना’पासून दूर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : बीएचयू आयएमएसच्या टीमने गंगा किनारी राहणाऱ्यांवर कोरोनाच्या दुष्परिणामांबाबत संशोधन केले आहे. गंगाजलाचा नियमित वापर करणाऱ्यांवर कोरोना संक्रमणाचा प्रभाव 10% असल्याचे या टीमने सादर केलेल्या संशोधनात म्हटले आहे. अमेरिकेच्या मायक्रोबायोलॉजीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

बीएचयूच्या न्यूरोलॉजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. रामेश्वर चौरसिया, न्यूरोलॉजिस्ट प्रो. व्हीएन मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील टीमला प्राथमिक सर्वेक्षणात असे आढळले की नियमितपणे गंगा स्नान आणि कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गंगा पाण्याचे सेवन करणाऱ्यांवर कोरोना संसर्गाचा प्रभाव होत नाही. टीमने आपल्या संशोधनात दावा केला आहे की गंगा स्नान करणारे 90 टक्के लोक कोरोना संक्रमणापासून बचावले आहेत. त्याचप्रमाणे गंगा किनाऱ्यावरील 42 जिल्ह्यांत इतर शहरांच्या तुलनेत कोरोनाचा संसर्ग 50 टक्क्यांहून कमी आहे आणि संसर्गानंतर लवकरच बरे होणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.

या लोकांचा टीममध्ये समावेश आहे

बॅक्टेरियोफेजच्या संशोधन टीममध्ये इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टॉक्सोलॉजी रिसर्च आयआयटीआर लखनऊचे वैज्ञानिक डॉ. रजनीश चतुर्वेदी, बीएचयूचे डॉ. अभिषेक, डॉ. वरुण सिंह, डॉ. आनंद कुमार आणि रिसर्च स्कॉलर निधी आणि अलाहाबाद हायकोर्टाचे अ‍ॅमिकस क्युरी अ‍ॅडव्होकेट अरुण गुप्ता यांचा समावेश आहे.

एथिकल कमिटीच्या होकाराची आहे प्रतीक्षा

गंगा पाण्यावर संशोधन करणार्‍या बायोफेस टीमचे लीडर प्रा. व्हीएन मिश्रा म्हणाले की, या अभ्यासानुसार गोमुखपासून गंगा सागर पर्यंत शंभर ठिकाणी सॅम्पलिंग करण्यात आले. कोरोना रुग्णांच्या फेज थेरपीसाठी गंगाजलाचा अनुनासिक स्प्रे देखील तयार करण्यात आला आहे. त्याचा डिटेल अहवाल आयएमएसच्या एथिकल कमिटीला पाठविण्यात आला आहे. प्रो. व्ही. भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यांच्या एथिकल कमिटीची मंजुरी मिळताच मानवी ट्रायलही सुरू होईल.

250 लोकांवर होईल ट्रायल

डॉ. व्हीएन मिश्रा म्हणाले की एथिकल कमिटीच्या संमतीनंतर 250 लोकांवर ट्रायल केली जाईल. निवडलेल्या लोकांच्या नाकात गंगनानी येथून आणले गेलेले गंगाजल आणि उर्वरित लोकांना प्लेन डिस्टिल वॉटर दिले जाईल. यानंतर परिणामांचा अभ्यास करून हा अहवाल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरकडे पाठविला जाईल.

पंचगंगा घाटात 49 लोकांच्या सॅम्पलिंगमध्ये एक व्यक्ती आढळला कोरोना पॉझिटिव्ह

बीएचयूच्या टीमने रविवारी पंचगंगा घाटात 49 जणांची कोरोना तपासणी केली. 48 लोक निगेटिव्ह आणि एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. यापूर्वी बुधवारी या पथकाने तुळशीघाट, भदैनी, चेतसिंह घाट, हरिश्चंद्र घाट येथे 54 जणांचे नमुने घेतले होते आणि सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.