करीनासह ‘या’ 8 ‘टॉप’च्या अभिनेत्री ‘आयटम नंबर’साठी घेतात ‘एवढे’ कोटी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बागी 3 या आगामी सिनेमातील डू यू लव मी हे गाणं अलीकडेच रिलीज झालं आहे. या गाण्यात अभिनेत्री दिशा पाटनीचं आयटम नंबर आहे. अनेक बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस आयटम नंबर करताना दिसत असतात. आज आपण त्यांच्या मानधनाविषयी जाणून घेणार आहोत.

1) कॅटरीना कैफ-
हृतिक रोशन आणि संजय दत्त स्टारर अग्निपथ सिनेमातील आयटम नंबरसाठी कॅटनं 3.5 कोटी घेतले होते अशी माहिती समजत आहे.

https://www.instagram.com/p/B7k_dkRBDVd/

2) दीपिका पादुकोण-
बॉलिवूडच्या टॉप अ‍ॅक्ट्रेसपैकी मानल्या जाणाऱ्या दीपिकानं अनेक सिनेमात आयटम साँग केलं आहे. रिपोर्टनुसार शाहरुख खानच्या सिनेमातील एका आयम साँगसाठी तिनं तिनं 7 ते 8 कोटी मागितले होते.

3) प्रियंका चोपडा-
गोलियों की रासलीला रामलीला सिनेमात केलेल्या आयटम नंबरसाठी प्रियंका चोपडानं 6 कोटी रुपये घेतल्याचं समजत आहे.

https://www.instagram.com/p/B9EguUMApk6/

https://www.instagram.com/p/B7dSlvfh5b0/

4) सनी लिओनी-
बेबी डॉल मै सोने दी हे सनी लिओनीचं आयटम साँग खूप लोकप्रिय झालं होतं. रिपोर्टनुसार, सनीनं बेबी डॉल आणि लैला या आयटम नंबरसाठी 3 कोटी एवढं मानधन घेतलं आहे.

5) करीना कपूर-
एका रिपोर्टनुसार करीना कपूरनं आपलं आयटम नंबर हलकट जवानीसाठी 5 कोटी रुपये घेतले होते.

https://www.instagram.com/p/B3J6mYnh10M/

https://www.instagram.com/p/B3cVzUShnrL/

6) जॅकलीन फर्नांडिस-
बागी 2 सिनेमात जॅकं एक दोन तीन या गाण्यावर आयटम नबंर केलं होतं. या साँगसाठी जॅकनं 2 कोटींची मागणी केली होती.

7) सोनाक्षी सिन्हा-
अक्षय कुमारच्या बॉस सिनेमातील पार्टी ऑल नाईट हे गाणं खूप गाजलं होतं. सोनाक्षीनं या गाण्यात स्पेशल अपीरंस दिला होता. सोनाक्षीनं या गाण्यासाठी 5 कोटींची मागणी केली होती.

https://www.instagram.com/p/B7PrkxfJLWs/

https://www.instagram.com/p/B9D1b31hqNR/

https://www.instagram.com/p/B89hzCnHtAd/

8) चित्रगंदा सिंह-
अक्षय कुमारच्या जोकर सिनेमासाठी चित्रगंधा सिंहनं काफिराना गाण्यासाठी 80 लाख रुपये घेतले होते.