home page top 1

पुणे : अमृतेश्वर घाटावर बोट उलटली तिघांना वाचविण्यात यश

३ दिवसात ८ जणांचे अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचवले प्राण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विसर्जनासाठी बोटीने नदीपात्रात गेले असताना बोट उलटल्याने नदीपात्रात पडलेल्या तिघांना अग्निशमन दलाच्या जवानांनी वाचविले. ही घटना अमृतेश्वर विसर्जन घाटावर गुरुवारी सायंकाळी ६ वाजता घडली. गेल्या ३ दिवसात अग्निशमन दलाच्या जीव रक्षकांना ८ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.

अमृतेश्वर घाटावर अग्निशमन दलाचे जवान विनोद सरोदे व जीवरक्षक तैनात आहेत. त्यांनी पाण्यात गेलेली बोट उलटल्याचे पाहून तातडीने पाण्यात धाव घेतली़ तिघांना बाहेर काढले.

औंध विसर्जन घाटावर विसर्जनाच्या दरम्यान पाय घसरल्याने १४ वर्षाची मुलगी पाण्यात पडली. अग्निशमन अधिकारी कमलेश सनगाळे यांनी तिला वाचविले. तर तेथेच एक ५४ वर्षाचा नागरिक बुडत असताना चंद्रकांत बुरुड यांनी वाचविले.

बुधवारी संगम घाटावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला अग्निशमन दलाच्या जीवरक्षकांनी वाचविले होते.

गणपती विसर्जना दरम्यान वृदेश्वर घाटाजवळ एक युवक बुडाल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे जवान एकनाथ कुंभार, गणेश शिंदे व जीवरक्षक भास्कर सुर्वे, विकी खंडागळे, गणेश जाधव, मंगेश सुपेकर, चौगुले यांनी बुडणाऱ्या युवकास वाचविले. गेल्या तीन दिवसात ६ जणांचा प्राण वाचविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

Loading...
You might also like