‘हे’ आहेत काॅंग्रेसचे नवनियुक्त तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – (माधव मेकेवाड) – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण नांदेड जिल्हा दौर्‍यावर आहेत. या दौर्‍या दरम्यान त्यांच्या सूचनेनुसार नुकत्याच जिल्हा प्रमुखांच्या नियुक्तींची घोषणा करण्यात आली. त्यानंतर दि.१७ रोजी विविध तालुक्यांमध्ये तरुणांना संधी देत त्यांच्यावर वेगवेगळ्या पदांची जबाबदारी देण्यात आली आहे.

यामध्ये माहूर तालुकाध्यक्ष म्हणून संजय राठोड तर माहूर शहराध्यक्षासाठी आनंद तुपदाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किनवट तालुकाध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, किनवट शहराध्यक्ष व्यंकटराव नेमाणीवार, हदगाव तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे, हदगाव शहराध्यक्ष खदीर खान वाहेद खान, हिमायतनगर तालुकाध्यक्ष विकास देवसरकर, अर्धापूर तालुकाध्यक्ष बालाजी गव्हाणे, अर्धापूर शहराध्यक्ष व्यंकटेश उर्फ राजू शेट्टे, मुदखेड तालुकाध्यक्ष उध्दवराव पवार, मुदखेड शहराध्यक्ष माधव कदम, नांदेड तालुकाध्यक्ष अ‍ॅड.निलेश पावडे, उपाध्यक्ष गंगाधरराव शिंदे, कंधार तालुकाध्यक्ष बालाजी माधवराव पांडागळे, कंधार शहराध्यक्ष म.हमिद म.सुलेमान, देगलूर शहर कार्याध्यक्ष रामदास स्वामी जिन्नोजी पेंटेय्या, बिलोली शहाध्यक्ष अमजद बहाद्दरखान चाऊस, उमरी तालुकाध्यक्ष प्रल्हादराव ढगे, धर्माबाद तालुकाध्यक्ष दत्ताहरी पाटील चोळाखेकर तर धर्माबाद शहराध्यक्ष म्हणून संजय उर्फ बंटी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व नवनियुक्त तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, माजी पालकमंत्री आ.डी.पी.सावंत, आ.सौ.अमिताताई चव्हाण, आ.वसंतराव चव्हाण, काँग्रेसचे महानगराध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या भावी कार्यास हार्दीक शुभेच्छा दिल्या आहेत.