शिवसेनेच्या स्टार प्रचारकांमध्ये संजय राऊत, रामदास कदम यांचा समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेनेने स्टार प्रचारकांची नावे घोषित केली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या नावाची घोषणा केली. या स्टार प्रचारकांच्या यादीत सुभाष देसाई, संजय राऊत, दिवाकर रावते, रामदास कदम, अनंत गीते, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, आदेश बांदेकर, गुलाबराव पाटील, विजय शिवतारे, सूर्यकांत महाडिक, विनोद घोसाळकर, नीलम गोऱ्हे, लक्ष्मी वढले, नितीन पाटील, वरूण सरदेसाई, राहुल लोंढे यांच्या नावांचा समावेश करण्यात आलेला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. आपल्या पक्षाची ध्येय धोरणे मतदारांपर्यंत पोहोचविण्यास सर्वच पक्षांना कालावधी कमी पडणार आहे. यामुळे प्रत्येक पक्षाचा आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आणि सभेत जास्त गर्दी जमवण्याची जबाबदारी स्टार प्रचारकांवर असणार आहे.

प्रचारासाठी काही दिवसांचाच कालावधी मिळणार आहे. यात शेवटचे दोन दिवस जाहीर प्रचार थांबणार असून, अवघ्या काही दिवसांत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढावा लागणार आहे. सगळ्याच पक्षाचे स्टार प्रचारक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणार असून, त्यामुळे जनतेची चांगलीच राजकीय करमणूक होणार आहे.