वर्गीकरणाच्या 202 कोटीच्या विषयाला उपसूचनांसह महासभेची मान्यता

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तहकूब केलेल्या सर्वसाधारण सभेतील वर्गीकरणाच 202 कोटी रुपयांच्या विषयाला उपसूचनांसह आज (बुधवारी) झालेल्या महासभेत मंजूरी देण्यात आली आहे. भोसरी, इंद्रायणीनगर प्रभागातील रस्त्यांच्या कामावरील तरतूद शून्य करण्यात आली आहे. दरम्यान, उपसूचनांवरुन विरोधकांनी मानदंड पळवण्याचा प्रयत्न करुन सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

जून महिन्याची तहकूब सभा आज (बुधवारी) पार पडली. महापौर नितीन काळजे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. मंगळवारी (दि.19) झालेल्या स्थायी समितीत आयत्यावेळी तब्बल 265 कोटी रुपयांच्या वर्गीकरणाचे विषय मंजूर केले होते. तसेच हे विषय महासभेकडे पाठविले होते. बुधवारी (दि.20) झालेल्या महासभेत तातडीची बाब म्हणून वर्गीकरणाचे विषय आयत्यावेळी दाखल करुन घेतले होते. त्या विषयावर शुक्रवारी (दि.22) झालेल्या महासभेत चर्चा झाली. त्यामध्ये भोसरी, इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक 8 मध्ये काँक्रीटकरणाचे रस्ते करण्यात येणार आहेत.
[amazon_link asins=’B015QWEHLO’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’88ac8cd2-7a1d-11e8-9a26-73e29f00ab54′]

त्यासाठी 100 कोटी रुपयांची रकमेची तरतूद केली होती. या विषयावरुन सत्ताधारी भाजपच्या स्थानिक नगरसेवकांमध्ये तीव्र मतभेद आहेत. आयुक्तांनी वर्गीकरणाचे पाचही विषय मागे घेण्याचे पत्र दिले होते. परंतु, सत्ताधाऱ्यांनी इंद्रायणीनगर येथील रस्त्याच्या कामाची तरतूद शून्य केली. उर्वरित चार विषय विरोधकांचा विरोध डावलून मंजूर केले.
[amazon_link asins=’B00UFF422M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8f14b7c7-7a1d-11e8-8607-e5f9a1d27136′]

20 नंबरच्या विषयावर विरोधकांनी मतदानाची मागणी केली. त्यावर उपसूचनेसह मंजूर करण्याच्या बाजूने 66 तर विरोधाच्या बाजून 37 मतदान झाले. महापौरांनी हा विषय मंजूर केला. त्यानंतर लगेच 21 क्रमांकाचा विषय देखील मंजूर केला. त्याला विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका घेत महापौरांसमोर हौदात धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. परंतु, या गोंधळातच महापौरांनी इतर विषय रेटून मंजूर केले. सभा संपल्यानंतर विरोधकांनी सभागृहात भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.