अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करणाऱ्या भाजप महासचिवाच्या मुलाला अटक

इंदौर : वृत्त संस्था – भाजप महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा आणि आमदार आकाश विजयवर्गीयला मनपा अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपी आमदार आकाश विजयवर्गीय यांना स्थानिक न्यायालयात सादर केले. आकाश विजयवर्गीय यांना न्यायालयात घेऊन जात असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून होणाऱ्या विरोधाला सामोरे जावे लागले. विजयवर्गीय यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात राज्य आणि पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली.

काय आहे प्रकरण?

भारतीय जनता पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांचा मुलगा व भाजप आमदार आकाश विजयवर्गीयने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केली होती. ही घटना मध्यप्रदेशमधील इंदौर येथे घडली. इंदौर महानगरपालिकेचा अधिकारी अतिक्रमण रोखण्यासाठी एक धोकादायक घर तोडण्याची कारवाई करत होता. आकाश विजयवर्गीय बॅटने मारहाण करत असतानाचा व्हिडीओ सोशलमिडीयावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आकाश विजयवर्गीय अत्यंत निर्दयपणे त्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत आहे.

मध्यप्रदेशचे गृहमंत्री बाला बच्चन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, कोणी कितीही मोठा नेता असो, कायदा हातात घेतल्यास कायदा त्याचे काम करेल.

आमदार आकाश विजयवर्गीय म्हणाले की, ही फक्त सुरवात आहे. आम्ही या भ्रष्टाचार आणि गुंडगिरीला नष्ट केले आहे. अर्ज, निवेदन नाहीतर दन दना दन हे आमचे पाऊल आहे. त्यांनी महिलांना खेचून घराबाहेर काढले. त्यांच्या जवळ महिला पोलीस असायला पाहिजे. मी जेव्हा तिथे पोहचलो तेव्हा तेथील लोक अधिकाऱ्यावर चिडले होते. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहोत.

आकाशशिवाय इतर १० लोकांवरही FIR

आकाश विजयवर्गीय यांच्यासह इतर १० लोकांविरुद्ध भारतीय दंड विधान ३५३, २९४,३२३,५०६, १४७,१४८ या कलमानुसार FIR दाखल करण्यात आला आहे.

आरोग्य विषयक वृत्त

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन

काळजी घ्या ! फास्टफूड ठरू शकते तुमच्या शरीरासाठी अपायकारक

फेसबुक पोस्टवरून समजणार तुम्ही कोणत्या आजाराशी झगडताय !

शहरातील ६० टक्के नागरिक घेतात फक्त ५ तासाची झोप, मधुमेह व मेंदूविकारात वाढ