पुण्यातील पाचही मानाच्या गणरायांचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

पुणे :  पोलीसनामा आॅनलाइन

संपूर्ण देशभरात बुद्धीची देवता, उत्साह आणि मांगल्याचे प्रतिक असलेल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले आहे. मंडळांच्या बाप्पाबरोबरच घरगुती गणरायाचे ही आगमन झाले आहे.  गणपत्ती बाप्पा मोरयाचा जयघोष करीत आज, गुरुवारी घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होत आहे.  पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणारा श्री कसबा गणपती मंडळ यांची प्राणप्रतिष्ठापना सकाळी११ वाजून ५५ मिनिटांनी करण्यात आली.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc63818f-b750-11e8-a461-7d38de1e3109′]

यावेळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक भय्याजी जोशी यांच्या हस्ते पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी 10 वाजता निघालेल्या कसबा गणपती मिरवणुकीमध्ये देवळाणकर बंधू यांचा नगारावादनाचा गाडा, श्रीराम, आवर्तन ढोल ताशा पथक आणि प्रभात बँड पथक मिरवणुकीच्या अग्रभागी होते. प्रतिष्ठापनेनंतर जोशी यांच्या हस्ते अभिनेते सुबोध भावे, वेदमूर्ती प्रकाश दंडगे, बास्केटबॉल संघाच्या कर्णधार शिरीन लिमये, एमआयटीचे राहुल कराड आणि आयुर्वेदतज्ञ  डॉ. योगेश बेंडाळे यांना श्री कसबा गणपती पुरस्कार तर, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. भास्करराव आव्हाड यांना अँड. भाऊसाहेब निरगुडकर पुरस्कार प्रदान  करण्यात येणार आला.

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या सेवेत ‘दबंग’ लेडी बाऊन्सर

मानाच्या दुसऱ्या असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या गणपतीची आज दुपारी साडेबारा वाजता प्राणप्रतिष्ठापना झाली. त्याअगोदर श्री ची मिरवणुक काढण्यात आली होती. न्यू गंधर्व बँड पथक, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल ताशा पथके मिरवणुकीच्या अग्रभागी होती.
मानाचा चौथा असलेल्या श्री तुळशीबाग गणपतीची प्राणप्रतिष्ठापना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ संस्थान अन्नछत्राचे संस्थापक जन्मेजय राजेभोसले यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली.

केसरीवाडा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीला सकाळी १० वाजता रमणबाग चौकातून सुरूवात झाली.  त्यानंतर मिरवणूक लक्ष्मी रस्ता, विजय चित्रपटगृह, माती गणपती मार्गे टिळक वाड्यातील सभामंडपात दाखल झाली. डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते   ‘श्रीं’ ची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेट गणपती आरती

युवा कलाकार विशाल ताजणेकर यांनी साकालेल्या काल्पनिक राजस्थानी महालामध्ये अखिल मंडई मंडळाची शारदा गजाननाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना बीव्हीजी ग्रुपचे हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या श्रींची प्राणप्रतिष्ठापना धुंडिराज पाठक यांच्या हस्ते सकाळी करण्यात आली. त्यापूर्वी गणपती मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता फुलांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती.  आप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली.  देवळणकर बंधूचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, दरबार बँड, मयूर बँड आणि मानिनी महिला ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीत सहभाग झाले होते.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’06e2a29d-b751-11e8-8e1b-e3924892a533′]

गणरायाच्या प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी शहराच्या विविध भागातून सार्वजनिक मंडळांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या होत्या. ढोल ताशा हे आता पुण्यातील गणेश प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य झाले आहे. त्याचा प्रत्यय आज आला. तरुणतरुणी बेभान होऊन तालात ढोल वादन करताना दिसत होते.  त्यांचे वादन ऐकण्यासाठी रस्त्यांवर भाविकांची चांगलीच गर्दी होत होती.