गोल्डन सिक्सर ! दररोज पहावयास नाही मिळत, बेन स्टोकचा अफलातून ‘सिक्सर’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम – इंग्लंड ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने अतिशय सुरेख खेळी केली. आपल्या खेळीदरम्यान विविध अफलातून चौफेर फटके मारले. परंतु , रिवर्स शॉट खेळत बेन स्टोक्सने एक असा षटकार मारला जो पाहून प्रेक्षकांचे डोळे दिपले असतील.

इंग्लंड ऑस्ट्रेलिया साठी अ‍ॅशेस ची मालिका अतिशय प्रतिष्ठेची असते. दोन्ही देशांसाठीअतिशय प्रतिष्टेची समजली जाणारी अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना सामना इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला धक्का देत विजय मिळवला. या सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरला तो म्हणजे, इंग्लंड चा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स होय. स्टोक्स ने, नाबाद १३५ धावांची खेळी करत इंग्लंड ला विजय मिळवून दिला. आपल्या नाबाद १३५ धावांच्या खेळीत ११ चौकार आणि ८ षटाकार मारले. बेन स्टोक्स खेळत असताना असे दिसून येते कि, तो फटका तंत्राचा वापर नाही तर ताकदीचा वापर करत असल्याचे दिसून येते. मात्र रिवर्स शॉट खेळत मारलेला हा षटाकार दैदिप्यमान च होता. प्रेक्षकांचे डोळे दिपवणारा होता.

तिसऱ्या कसोटी सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगज्जेत्या इंग्लंडला पहिल्या डावात केवळ ६७ धावांवर बाद होण्याची नामुष्की आली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे सर्व मनसुबे उधळून लावत इंग्लंडनं ऐतिहासिक विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडने मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. इंग्लंडनं ३५९ धावांचा पाठलाग करताना, २८६ धावांवर नऊ विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी स्टोक्स ६१ धावांवर खेळत होता. त्यानंतर स्टोक्सने चक्क १३५ धावांची सर्वांना चकित करून टाकणारी खेळी केली.

आरोग्यविषयक वृत्त –