ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याने दिली गुन्ह्याची कबुली 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन

 

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणासंबंधित अटक करण्यात आलेल्या परशुराम वाघमारेने आपल्या गुन्ह्याची कबुली एसआयटीने केलेल्या चौकशीत  दिली आहे. हत्या प्रकरणी परशुराम वाघमारेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली आहे.

तसेच सुपारी देणाऱ्यांनी पैसे न दिल्याचा देखील त्याने खुलासा केला. सुपारी देणाऱ्यांनी केवळ 10 हजार रुपये अॅडव्हान्स आणि बंगळुरुत राहण्यासाठी तीन हजार रुपये दिले. उर्वरीत रक्कम न देताच ते पिस्तुल घेऊन फरार झाले, असं वाघमारेने एसआयटीच्या चौकशीत सांगितले.

[amazon_link asins=’B07B23F2S1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’322e29b0-790a-11e8-a46b-f5d9d0e559da’]

आहे कोण हा परशुराम वाघमारे?

विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्याचा रहिवासी असलेला परशुराम अशोक वाघमारे (वर्षे 26). बसव नगरात त्याचं घर आहे. आई भांडे विकते तर वडील मिळेल तिथं काम करतात.

परशुरामने बीएससी डिप्लोमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला होता. एकुलता एक मुलगा असल्याने घरी परशुरामचे लाड व्हायचे. पण हिंदुत्ववादी विचाराने तो कमालीचा प्रेरीत झाला होता. हिंदुत्वासाठी वाटेल ते करण्याची त्याची तयारी होती. त्यातच महाराष्ट्रातल्या अमोल काळे याच्याशी त्याचा संपर्क झाला. धर्म रक्षण्यासाठी प्रसंगी जीवही घ्यायची तयारी त्याने केली. बेळगावात डोंगरावर, रानावनात जाऊन मित्रांच्या साथीने एअरगन चालवण्याच प्रशिक्षण घेतलं.

परशुरामची पार्श्वभूमी थोडी वादग्रस्त आहे. काही करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची सवय परशुरामला होती.  त्यासाठी सामाजिक शांतता बिघडवण्याच्या कामात व्यस्त तो असायचा.

आईवडील गेल्या काही वर्षांपासून रायचूर जिल्ह्यातील मानवी गावात कामासाठी वास्तव्याला आहेत. परशुराम कॉलेज शिकत असल्याने तो सिंदगी गावातच राहिला. अर्थार्जन करण्यासाठी म्हणून त्याने नेट कॅफे सुरू केला. या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ तो लोकांना मिळवून द्यायचा. पण असं काही विपरीत काम करेल याची कल्पना परशुरामच्या आईवडिलांना नव्हती.

सिंदगी पोलीस ठाण्यात 2012 साली त्याच्या विरोधात समाजविघातक कृत्ये केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. प्रमोद मुतालिक यांनी श्रीराम सेना काढली, तेव्हा सिंदगी तालुक्यातील श्रीराम सेनेच्या विद्यार्थी संघटनेची जबाबदारी तो पार पाडायचा.

परशुरामच्या दोन अन्य साथीदारांना सुद्धा एसआयटीने ताब्यात घेतलंय. परशुरामने चालवलेल्या बंदुकीतून गौरी लंकेश यांची हत्या झाली हे आता उघड झालंय. पण एका महिलेला मारले याचा त्याला नंतर पश्चातापही  झाला.

यापलीकडे जाऊन परशुराम आणि त्याच्या साथीदारांच्या हातून हे कृत्य घडवून आणणाऱ्या सूत्रधारांचा शोध घेणे हे जास्त महत्वाचे ठरेल. तसेच गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध दाभोळकर आणि पानसरे यांच्या प्रकरणाशी असावा अशी शक्यता नाकारता येत नाही.