औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला ५ हजारांची लाच घेताना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

मेडिकल दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी पाच हजारांची लाच घेताना औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्तास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई सांगलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.२८) सायंकाळी विजयनगर चौक परिसरात केली. या कारवाईमुळे अन्न व औषध विभागात खळबळ उडाली आहे.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ce4546ab-aae1-11e8-8c67-b3ec69a7f866′]

दिलीप काशिनाथ जगताप (वय 57, सध्या रा. विजयनगर, सांगली, मूळ रा. सातारा) असे त्याचे अटक करण्यात आलेल्या औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्ताचे नाव आहे.

साईबाबांच्या नावाने बनावट मतदान कार्ड काढण्याचा प्रयत्न 

जगताप यांनी सांगलीच्या औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणून तीन महिन्यांपूर्वीच कार्यभार स्विकारला आहे. विजयनगर चौक परिसरातील एका मेडिकल दुकानाचा औषध विक्रीच्या परवान्याचे नूतनीकरण करायचे होते. त्यासाठी जगताप यांनी त्या दुकानदाराकडे पाच हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत संबंधित दुकानदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर जगताप यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’dcb2a9b0-aae1-11e8-ae3b-1fcd404aecc6′]

मंगळवारी सायंकाळी तक्रारदार दुकानदाराकडून पाच हजार रूपयांची लाच स्विकारताना जगताप यांना रंगेहात पकडण्यात आले. विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चे काम सुरू होते. दरम्यान शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी लाचेची मागणी केल्यास लाचुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन उपअधीक्षक राजेंद्र तेंडूलकर यांनी केले आहे.

वाचा आजच्या टॉप बातम्या