खळबळजनक ! दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या सहाय्यक निरीक्षक, पोलिसावर खुनी हल्ला, फावड्यानं तोडले पाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकार्‍यांवरच हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी पोलिस अधिकार्‍यांवर हल्ला करून फावड्याने त्यांचे पाय तोडले आहेत. माणगाव तालुक्यातील इंदापूर-पाणसई येथे पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

सहायक पोलिस निरीक्षक सागर कावळे आणि हवालदार टेकाळे अशी जखमी पोलिसांची नावे आहेत.
माणगाव तालुक्यातील इंदापूर-पाणसई येथे पहाटे तीन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांची टोळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सागर कावळे आणि हवालदार टेकाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दरोडेखोरांचा पाठलाग करताना त्यांनी पोलिसावर हल्ला केला. दरोडेखोरांनी फावड्याने घाव घातल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात दोन्ही पोलिसांच्या पायाचे हाड मोडले आहे. त्यांना माणगाव उपजिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यात सगळीकडे नाका बंदी करण्यात आले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like