माथेफिरूचा प्रताप : रेल्वेची ओव्हरहेड वायरला स्पर्श करून आत्महत्येचा प्रयत्न

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – बोईसर रेल्वे स्थानकात माथेफिरू तरुणाने चाकू हातात घेऊन २५ हजारा व्होल्ट क्षमतेच्या ओव्हरहेड वायरला स्पर्श करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वेने तात्काळ वीजपुरवठा खंडीत केला. त्यामुळे तो बचावला. मात्र या तरुणाच्या कृत्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल वाहतुक काही काळ विस्कळीत झाली. कुटुंबियांच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याचे म्हणणे आहे.

मोहम्मद तमने (वय. २३) असे या तरुणाचे नाव आहे. तमने हा मुळचा बिहारमधील समस्तीपुर जिल्ह्यातील राहणारा आहे. आज सकाळी तो बोईसर रेल्वे स्थानकातील फुट ओव्हर ब्रीजवर चढला आणि हातात चाकू घेऊन २५ हजार व्होल्ट क्षमतेच्या वायर जवळ उभे राहून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे प्रशासनाने तात्काळ वीजपुरवठा खंडीत केला. तब्बल दोन तासाच्या प्रयत्नांनंतर माथेफिरूला पकडण्यात यश आले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. त्यानं घातलेल्या गोंधळामुळे काही काळ पश्चिम रेल्वेची लोकल वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.