ज्येष्ठ महिलेच्या सजगतेमुळे चोरट्याचा प्रयत्न फसला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन : ( विजय डोंगरे) –  ” एकीचे बळ मिळते फळ ” हि म्हण आपण ऐकलीच असेल  .आज तिचा प्रत्यय शहरा जवळील वरखेडी गावात आला . या बाबत वरखेडी गावात राहणारे अरुण पवार यांनी दिलेल्या माहिती नुसार , गावात नविन अपार्टमेंट तयार झाले आहेत . त्यातीलच एका अपार्टमेंट मधील फ्लॅटमध्ये मध्यराञी चोर शिरला.

यमुनाबाई पाटील या ज्येष्ठ महिला घरात एकट्या होत्या . त्यांना घरात मोठा आवाज आल्याने त्या जाग्या झाल्या . टॉर्च घेऊन त्यांनी शोध घेतला असता , कोणी अज्ञात व्यक्ती त्यांना दिसला आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली . त्यांच्या आवाजाने जवळपास असलेले नागरीक मदतीसाठी धावून आले . लोकांना पाहून भांबावलेला चोरटा अपार्टमेंटच्या छतावर चढला आणि मागील बाजुस असलेल्या अंगणवाडीच्या छतावर उडी मारत अंधाराचा फायदा घेत  शेतात पसार झाला .

ज्येष्ठ महिलेने दिलेल्या एका हाकेमुळे सगळे ग्रामस्थ हाकेला दाद देत चटकन एकञ आले . त्यानंतर सर्वानी मिळून अपार्टमेंट जवळील काही भाग चाचपडून पाहिला , परंतु कोणीही नजरेस दिसले नाही. लोक वेळीच धावून आल्याने चोरट्याचा प्रयत्न फसला . यातुन एकच लक्षात येते कि ” ऐकीचे बळ , मिळते फळ ” गावात ज्येष्ठ महिलेने दाखविलेल्या धैर्याेचे सर्वञ कौतुक होत आहे . पोलीसांनी गावात गस्तीत वाढ करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली .