‘लॉकडाऊन’मध्ये मनोज वाजपेयीच्या 2007 साली आलेल्या ‘या’ सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून ‘प्रतिसाद’ ! 2 आठवड्यात 1.5 कोटी Views

पोलिसनामा ऑनलाइन –मनोज वाजपेयी, रवी किशन, दीपिक डोबरियाल, कुमुद मिश्रा, पियुष मिश्रा आणि मानव कौल स्टारर सिनेमा 1917 सध्या खूप चर्चेत आहे. 2007 साली आलेला हा सिनेमा पुन्हा एकदा धमाल करताना दिसत आहे. याचमुळं हा सिनेमा खूप व्ह्युज घेताना दिसत आहे. युट्युबवर अपलोड केल्यांतर दोनच आठवड्यात सिनेमानं दीड कोटी व्ह्युज मिळवले आहेत. याशिवाय सोशलवरही सिनेमाचं कौतुक होताना दिसत आहे.

नॅशनल अवॉर्ड विनिंग सिनेमा

या सिनेमाची चर्चा होण्याची तशी ही काही पहिलीच वेळ नाही. 2007 साली आलेल्या या सिनेमाला बेस्ट फीचर फिल्मचा नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. अमृत सागर आणि पियुष मिश्रा यांनी मिळून हा सिनेमा लिहिला आहे. अमृत सागरनं हा सिनेमा डायरेक्ट केला आहे.

https://twitter.com/Manavkaul19/status/1249329249913171969

काय आहे सिनेमाची स्टोरी ?

1971 मधील भारत पाक युद्धानंतर पाकिस्तानात बंद असलेल्या युद्ध कैद्यांची ही स्टोरी आहे. यांची हालत खूप खराब असते. भारत सरकारचं यांच्यावर कोणतंही लक्ष नाही. 6 युद्ध कैदी पाकच्या जेलमधून पळून जातात. त्यांच्या पलायनावर आणि यानंतर त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टींवर आधारीत हा सिनेमा आहे.

https://twitter.com/Manavkaul19/status/1248505297611587585