Coronavirus impact : ‘कोरोना’च्या भितीनं क्रिकेटला दाखवले ‘हे’ दिवस, ज्याचा कुणी विचारही केला नसेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिडा जगतात अशी बिकट स्थिती कधीही दिसून आली नव्हती. कोरोना व्हायरसने जगभरातील खेळांना असाहाय्य बनवले आहे. असे असाहाय्य की, जे चालत तर आहेत, परंतु त्यांचा श्वास, जीव आणि धैर्य खचले आहे. शुक्रवारी क्रिकेटच्या जगतात दिवसाची सुरूवात अशी झाली, जेथे खेळण्यासाठी खेळाडू तर होते, परंतु त्यांना प्रोत्साहन देणारे प्रेक्षक उपस्थित नव्हते. खरं तर शुक्रवारी झालेला तो खेळ मुका, निर्जीव आणि निस्तेज दिसला.

सिडनीत प्रोत्साहनासाठी केवळ एक स्टॅच्यू
ऑस्ट्रेलियात प्रेक्षक आपल्या टीमला अर्धा जीव समजतात. स्टँडमध्ये बसून खेळाडूंना नेहमी प्रोत्साहन देत असतात. परंतु, शुक्रवारी वेगळेच चित्र दिसत होते. सिडनीच्या रिकाम्या स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये पहिली वनडे मॅच झाली. दर्शकांच्या नावाने स्टँडमध्ये केवळ स्टीफन हेरल्ड उर्फ यब्बाचा एक पुतळा होता, जो कधी आपल्या एक लायनरने कांगारू टीमला प्रोत्साहन देत असे. 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाचे हेरल्ड यांना सन्मानित करण्यासाठी त्यांचा स्टॅच्यू लावण्यात आला होता.

ऑस्ट्रेलियाच्या टीमचा कॅप्टन अ‍ॅरोन फिंच आणि न्यूझीलँडचा कॅप्टन केन विल्यम्सन टॉससाठी मैदानात पोहचले, तेव्हा विल्यम्सनने चुकीने हात मिळवला. यानंतर तो आपले हात पुसताना दिसून आला. परिस्थिती अशी होती की गोलंदाजाने विकेट घेतली तरी आनंदही व्यक्त करता येत नव्हता. एकमेकांना हात मिळवणे आणि गळाभेट घेणे ते टाळत होते.

ऑस्ट्रेलियाने 18व्या ओव्हरमध्ये ईश सोढीच्या पहिल्या चेंडूवर फिंचने षटकार लगावला. प्रेक्षक नसल्याने क्षेत्ररक्षक लॉकी फर्ग्युसनला स्टँडमध्ये जाऊन चेंडू आणावा लागला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे चित्र कधीच दिसले नव्हते.

हे सामने सुद्धा झाले बंद दरवाजाआड
सौराष्ट्रच्या टीमने बंगालला पराभूत करून शुक्रवारी इतिहासात प्रथमच रणजी ट्रॉफी जिंकली. हा क्षण त्यांच्यासाठी खुप आनंदाचा होता, परंतु या जल्लोषात त्यांच्यासोबत उभे राहणारे प्रेक्षकच नव्हते. कारण अखेरच्या दिवशीची मॅच बंद दरवाज्याआड खेळण्यात आली. खेळाडुंच्या या आठवणी डोळ्यात साठवण्यासाठी त्यांचे काही नातेवाईक तेवढे उपस्थित होते. अशाच प्रकारे पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये मुल्तान सुल्तान्स आणि पेशावर जाल्मीमध्ये खेळली गेलेली मॅच प्रेक्षकांशिवाय झाली. पीसीएलमध्ये यापुढे सुद्धा अशाच मॅच होणार आहेत.