अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या कुटुंबातून समोर आली वाईट बातमी, ‘या’ खास व्यक्तीचं निधन

पोलीसनामा ऑनलाईन :अलीकडेच बॉलिवूड स्टार सलमान खानच्या पुतण्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर आता अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिच्या फॅमिलीतून वाईट बातमी समोर आली आहे. काल रात्री इलियानाच्या अंकलचं निधन झालं आहे. तिच्या कुटुंबावर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. इलियानानं इंस्टावरून याबाबत माहिती दिली आहे.

इलियायानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या अंकलचा आहे. व्हिडीओत तिचे अंकल एका ड्रॉपरच्या मदतीनं एका खारीला दूध पाजताना दिसत आहेत. दूध पिऊन झाल्यानंतर ती खार तिच्या अंकलच्या खांद्यावर उड्या मारताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करताना इलियानानं इमोशनल मेसेज लिहिली आहे. इलियाना म्हणते, “माझ्याकडे तुमचे एवढे फोटो, ऑडिओ, व्हिडीओ एवढं सारं असूनही तुम्ही गेलात हे मानायला माझं मन तयारच नाही. तुम्ही सर्वात अद्भुत, सुंदर आणि सज्जन व्यक्ती होतात ज्यांना मी ओळखत होते. हे लिहिणंही मला खूप त्रासदायक वाटत आहे. विश्वासच होत नाहीये की, तुम्ही नाहीत. काश मी तुम्हाला सांगू शकले असते की, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. मला नाही माहिती स्वर्ग असतो की, नाही पण असेल तर मला खात्री आहे तुम्ही तिथे असाल.

या पोस्टमध्ये इलियाना म्हणते तुम्ही माझे दुसरे वडिल होते. आशा करते मी उद्या सकाळी उठेल तेव्हा असं वाटेल की, हे फक्त एक वाईट स्वप्न होतं. काश माझ्याकडे अजून वेळ असती, काश मी तुमच्याशी एकदा बोलू शकले असते.