गुंड आप्पा लोंढे खून प्रकरणातील मुख्य आरोपीचा जामीन 2 महिन्यांनी वाढवला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – गुंड अप्पा लोंढे खूनप्रकरणातील मुख्य आरोपीला वैद्यकीय कारणास्तव दिलेला तात्पुरता जामीन विशेष मोक्का न्यायालयाने आणखी दोन महिन्यांसाठी वाढवून दिला आहे. न्यायमूर्ती सिरसीकर यांनी हा आदेश दिला. विष्णू यशवंत जाधव असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. जाधव हा या खुनाच्या गुन्ह्यात गेल्या 5 वर्षांपासून कारागृहात आहे.परंतु वैद्यकीय कारणास्तव
27 एप्रिल 2020 ला विशेष मोक्का न्यायालयाने एक महिन्याकरिता जामीन मंजूर केला होता.

उपचार सुरू असताना आणखी काही आजार असल्याचे समजले. त्यानंतर आरोपीचे वकील विजयसिंह ठोंबरे व हितेश सोनार यांच्यामार्फत न्यायालयात जामीनाची मुदत वाढवून मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने याबाबत ससून रुग्णालयाच्या मेडीकल बोर्डासमोर वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले होते. त्यावेळी मेडिकल बोर्डाने त्याची वैद्यकीय तपासणीत केली व त्याचा अहवाल आज न्यायालयात सादर केला.

यावर वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडताना वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होऊन नुकसान होणार आहे. न्यायालयाने बाजू ऐकूण घेतल्यानंतर न्यायालयाने तात्पुरत्या जामीनाची मुदत आणखी दोन महिन्यांसाठी वाढवून दिली. आरोपिच्या वतीने वकिल विजयसिंह ठोंबरे, वकिल हितेश सोनार व विष्णू होगे यांनी काम पाहिले.