बॅलेट पेपरवरील मतदानाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन – बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे, या मागणीसाठी साताऱ्यात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलनही करण्यात आले. जगभरात सर्वत्र मतदानप्रक्रियेत बॅलेट पेपरचा वापर होत असताना भारतात मात्र ईव्हीएम मशीनचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल या संघटनेने केला आहे.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जगभरात बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात येते. भारतात मात्र ईव्हीएम मशीनचाच वापर केला जात आहे आणि त्यासाठीच आग्रह केला जातो. ईव्हीएम मशीन या मानवनिर्मित असल्यामुळे त्यात हॅकिंगचा धोका आहे. देश संविधानावर चालत असताना ईव्हीएमचा वापर करुन संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे. लोकशाही टिकवण्यासाठी निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. त्यामुळे ती खुली, पारदर्शक, न्याय आणि विश्वासार्ह असावी. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करता बॅलेट पेपरचाच वापर करावा.

या धरणे आंदोलनात जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे, युथ जिल्हाध्यक्ष आबा वाघमारे, बापू लांडगे, स्वप्नील रोकडे, इम्रान आत्तार, अमृत बुक्कल, अक्षय साळवे, जयसिंग गोखले, बंटी कांबळे, शिवप्रसाद बामणे, प्रतीक रोकडे, ऋषीकेश बन्ने, स्वप्नील निकाळजे, विजय खुडे, नितीन मोहिते, शिवाजी गायकवाड, अक्षय जोगदंड, अविनाश सावंत, केतन येळे, बाबू वैरागे, विशाल पवार त्याचबरोबर अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

बलात्कार व खूनाच्या ‘त्या’ प्रकरणांचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी