सावरकरासंबंधित ‘त्या’ पुस्तकावर ‘बंदी’ आणावी, सावरकरांच्या नातूंची मुख्यमंत्र्याकडे ‘कारवाई’ची मागणी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – भोपाळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात एका पुस्तिकेमुळे वाद निर्माण झाला आहे. शिबिरात वाटप करण्यात आलेल्या पुस्तिकेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करण्यात आले आहे. त्यानंतर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी या पुस्तकावर सरकारकडून बंदी आणण्यात यावी अशी मागणी केली आहे.

रणजीत सावरकर म्हणाले की सावरकऱ्यांची अशी बदनामी करणाऱ्याविरोधात कारवाई होणे आवश्यक आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की त्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी आणि या प्रकरणी फौजदारी कारवाई करत गुन्हा दाखल करावा. सावरकर यांचे नातू असलेले रणजीत सावरकर यांनी काँग्रेस सेवा दलाच्या या पुस्तकात दिलेल्या वादग्रस्त विधानाची निंदा केली. काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले की काँग्रेसची ही कनाहनी बनली आहे.

परंतु यावर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांनी या पुस्तकात देण्यात आलेल्या विधानांची पाठराखण केली. ते म्हणाले की सावरकर नक्की काय आहेत हे देशासमोर आले नाही. सावरकरांचे वास्तविक चित्र या पुस्तकातून मांडण्यात आले आहे, हे वास्तव मांडताना आम्ही त्यांच्यासंबंधित संशोधन केले आहे. सावरकरांचे वास्तव या पुस्तकांच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/